एका मच्छरनं हिनाला बनवलं लाखो दिलांची धडकन, तिल...

एका मच्छरनं हिनाला बनवलं लाखो दिलांची धडकन, तिला अभिनयात यायचं नव्हतं… (A Mosquto Made Hina Khan The Beating Of Millions Of Hearts, Acting Was Not The Destination)

एके काळी हिंदी सिने सृष्टीचा छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री हीना खान (Hina Khan) हिंदी बिग बॉस मुऴे खूप चर्चेत आली. तिच्या फॅन फॉलोवींगमध्ये सुद्धा बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. छोटया पडद्यावर अक्षरा या भुमिकेने हीनाला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. असे म्हणतात ग्लॅमरस्‌ वर्डमध्ये एन्ट्री घ्यायची असेल तर डोक्यावर कोणत्या ना कोणत्या गुरुचा वरदहस्त असावा लागतो. पण हीनाच्या बाबतीत थोडे वेगळेच घडले. तिला या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी मदत केली ते एका किरकोळ मच्छरने. तुम्हाला हे वाचून नक्कीच हैराण व्हायला झालं असेल, पण हे खरे आहे..

हीनाला एक मच्छर चावला आणि तिला थेट इंडस्ट्रीचे दरवाजे उघडे झाले. आपल्या दिलखेचक अदांनी आणि हटके स्टाईलने चर्चेत राहणारी हीना हिला कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते. शाळेत असताना तिला एक पत्रकार बनायचे होते. त्यानंतर कॉलेज मध्ये गेल्यावर तिने एअर होस्ट्रेस बनण्याची तयारी सुरु केली. ती या कोर्ससाठी ॲडमिशन पण घेणार होती. पण नियतीच्या मनात कदाचित काहीतरी वेगळेच होते. ती या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायला गेली पण त्याचवेळी खूप डास चावल्यामुळे तिला मलेरीया झाला. आणि एका मच्छरने तिचे एअर होस्ट्रेस होण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्राकडे तिचा मोर्चा वळवला.

ती एअर होस्ट्रेस होऊ शकली नाही, याचे दुःख तिला खूप सलत होतेच. पण त्याचवेळी तिच्या आयुष्यात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका आली. अभिनय क्षेत्राचा कोणताच पाया नसल्यामुळे या मालिकेसाठी हीनाने एक ॲक्टींग कोर्ससुद्धा केला. यानंतर तिची मालिका सुरु झाली व हीना ही अक्षरा म्हणून घराघरात पोहचली. तिचे काम लोकांना खूप आवडले. त्या मालिकेसाठी हीनाला बरेच पुरस्कार देखील मिळाले.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिके व्यतिरिक्त हीनाने नागीन आणि ‘कसोटी जिंदगी की २’ या मालिकांमध्येही काम केले. तिच्या या मालिका देखील सुपरहीट ठरल्या. त्यानंतर ती हिंदी ‘बिग बॉस  सीजन 11’ ची विजेती ठरली. ‘फियर फॅक्टर : खतरों के खिलाड़ी’ सीजन 8 मध्ये सुद्धा प्रेक्षकांची मने जिंकण्यात ती यशस्वी झाली.

सध्या हीना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे कान्स फेस्टीवल. हीना ही जगातील एकमेव अशी अभिनेत्री आहे, जी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असूनही तिला सर्वात मोठ्या फॅशन फेस्टीवल मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या वर्षी तिचे कान्स फेस्टीवलमध्ये सहभागी होण्याचे दुसरे वर्ष आहे. या वर्षी देखील तिचे स्टाईल स्टेटमेंट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)