पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतच्या स्विमिंग पूलमधील ए...

पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतच्या स्विमिंग पूलमधील एका हॉट फोटोशूटमुळे सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या वैवाहिक जीवनात पडली ठिणगी(A Hot Photoshoot With Pakistani Actress Became The Reason Behind Sania Mirza- Shoaib Malik’s divorce, Shoaib’s Pics with Pakistani Actress Go Viral)

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिचा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत घटस्फोट झाला आहे. सध्या तरी त्यांनी याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नसले तरी काही कायदेशीर अडचणी सोडवल्यानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक स्वत: घटस्फोटाची अधिकृत घोषणा करतील, असे सांगितले जात आहे.

शोएबने सानियाची फसवणूक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्यात घटस्फोट झाला आहे. शोएबचे नाव एका पाकिस्तानी अभिनेत्रीशी जोडले जात आहे. त्यांच्यात वाद सुरू होण्यामागे शोएब मलिकचे या पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचे बोल्ड फोटोशूट असल्याचेही सांगितले जात आहे.

2017 मध्ये शोएब मलिक आणि आयशा उमरने हॉट फोटोशूट केले होते. स्विमिंग पूलमधील हॉट फोटोशूटचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या फोटोशूटमध्ये शोएबने मॉडेल-अभिनेत्रीसोबत अतिशय सिझलिंग पोज दिल्या. त्यांच्यामध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. या फोटोशूटनंतर शोएबची अभिनेत्रीसोबतची जवळीक वाढू लागली. त्यामुळे सानिया आणि शोएबच्या वैवाहिक जीवनामध्ये ठिणगी पडली.

घटस्फोटाबाबत या जोडप्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी बऱ्याच दिवसांपासून दोघांमध्ये  काही ठीक नसल्याच्या बातम्या येत होत्या. पण सानिया मिर्झाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांना उधाण आले.

गेल्या आठवड्यात सानिया मिर्झाने मुलगा इझानसोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला होता . त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलेले की, “हे क्षण जे मला सर्वात कठीण दिवसांवर मात करण्यास मदत करतात.” सानियाने एक स्टोरी देखील शेअर केली होती, त्यात लिहिलेले, “तुटलेली मने कुठे जातात? तर, ते अल्लाहकडे जातात.”

त्याचवेळी शोएबने मुलासाठी एक पोस्ट देखील लिहिली – “जेव्हा तुझा जन्म झाला, तेव्हा आम्ही अधिक नम्र झालो आणि हे आयुष्य आमच्यासाठी खूप खास होते. आपण एकत्र असू शकत नाही आणि रोज भेटू शकत नाही पण बाबा प्रत्येक सेकंदाला तुझा आणि तुझ्या हसण्याचा विचार करतात. तू जे काही मागशील ते अल्लाह तुला देईल. बाबा आणि आई तुझ्यावर प्रेम करतात.”

दोघांनीही आतापर्यंत घटस्फोटाबाबत काहीही बोलले नसले तरी दोघांचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे, विविध शोसाठीचे करार आणि कायदेशीर त्रूटींमुळे दोघेही घटस्फोटाची घोषणा करत नाहीत. हा करार पूर्ण होईपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सानिया आणि शोएबने आपला मुलगा इझान मिर्झा मलिकचे सहपालक होण्याचा निर्णय घेतला आहे.