गौरी खानच्या ५० व्या वाढदिवसाची जंगी पार्टी झाल...
गौरी खानच्या ५० व्या वाढदिवसाची जंगी पार्टी झाली रद्द… (A grand party was to be held in Mannat today on Gauri Khan’s 50th birthday: All Celebrations Cancelled After Aryan’s arrest)

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानची पत्नी आणि फॅशन दिवा गौरी खानचा आज वाढदिवस आहे. गौरी खान आपला ५० वा वाढदिवस खरं तर मोठ्या धुमधडाक्यात साजरा करणार होती. परंतु कुटुंबावरील संकटामुळे खचितच ती आपला वाढदिवस साजरा करेल.
आर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुख खानला मोठा धक्का बसला आहे. मात्र आर्यनच्या जामिनावर पुढील सुनावणी आज (शुक्रवार 8 ऑक्टोबर) होणार आहे. आर्यनची रवानगी तुरुंगात होणार की तो ‘मन्नत’वर जाणार, याचा फैसला तेव्हाच होईल.
बर्थ डे पार्टी रद्द केली

आज आर्यनची मम्मी गौरी खान पन्नाशीची झाली आहे. आर्यनच्या अटकेपूर्वीच गौरीचा हा वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा करण्याचे ठरले होते. त्यानुसार मन्नतवर शानदार पार्टीची तयारीही करण्यात आली होती, परंतु आर्यनच्या अटकेनंतर ही पार्टी रद्द केली आहे. आज आर्यनला जामीन मंजूर झाला तर गौरीसाठी वाढदिवसाचे हे मोठं गिफ्ट असणार आहे.

गौरीची लाडकी लेक सुहानाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आर्यनच्या अटकेनंतर सुहानाने ही पहिलीच पोस्ट शेअर केली आहे. सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुहानाने शाहरुख आणि गौरीचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत, ‘आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,’ असे सुहानाने लिहिले आहे. दरम्यान गौरीला तिचे फ्रेंडस्ही वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देत आहेत.

शाहरुख खान देखील आपल्या मुलाच्या अटकेमुळे काही दिवसांपासून तणावात आहे. ज्याचा परिणाम त्याच्या कामावर होताना दिसत आहे. त्याने त्याच्या सर्व चित्रपटांचे शूटिंग सध्या थांबवलं आहे. आज आर्यनला जामीन मिळाल्यास शाहरुख आणि गौरी दोघांसही निश्चितच दिलासा मिळणार आहे.