गणेश चतुर्थी निमित्त सुबक गणेश मूर्ती, शोभेच्या...

गणेश चतुर्थी निमित्त सुबक गणेश मूर्ती, शोभेच्या पितळी वस्तू आणि नारायण पेठ साडी यांचा खास संग्रह सादर (A Classic Collection Of Ganesh Idol, Artistic Brass Lamps And Narayanpeth Sarees Unveiled On The Occassion Of Ganesh Chaturthi)

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ‘जयपोर’ या ऑनलाईन ब्रॅण्डने सुबक गणेश मूर्ती, सुंदर नक्षीकाम असलेले दिवे- निरांजन- पणत्या, दागिने आणि हाती विणलेल्या कलात्मक नारायणपेठ आणि माहेश्वरी सुती साड्यांचा छानसा संग्रह ऑनलाईन उपलब्ध केला आहे.

जयपोर हे आदित्य बिर्ला समुहाच्या आधाराने कार्यरत आहेत.

धातूंच्या गणेश मूर्ती तसेच अस्सल दक्षिण भारतीय पितळी उरळी, तेलाचे दिवे यांचा संग्रह इथे आहे.

तसेच तेलंगणातील जरीचा काठ असलेली नारायणपेठ साडी यात आहे. या साडीचे पहिले नारायणपेठ विणकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यासह या प्रदेशात आल्याची आख्यायिका आहे.

जरपोरच्या रत्नजडीत राबीबरा कलेक्शनमध्ये एखाद्या राणीला साजेशी माहेश्वरी साडी आहे. इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या आग्रहाखातर पहिली माहेश्वरी साडी तयार करण्यात आली होती. अशी ही ऐतिहासिक आहे.

नारायणपेठ साडी