या ९ सवयी असणाऱ्या मुलींपासून मुलं दूर पळतात(9 ...

या ९ सवयी असणाऱ्या मुलींपासून मुलं दूर पळतात(9 Habits of Women That Turn Men Off)

आपल्याला प्रत्येकालाच चांगली-वाईट अशी कोणती ना कोणती सवय असतेच आणि प्रत्येक सवय ही कधी ना कधी आपला परिणाम दाखवतेच. त्यातही मुलींच्या सवयी… जी व्यक्ती त्यांना सहन करते त्यांनाच माहीत असं म्हणावयास हरकत नाही. जसे काही मुलींना मुलांच्या काही सवयी आवडत नाहीत, त्याप्रमाणेच मुलींच्याही काही सवयी मुलांना आवडत नसतात. ते त्यांच्या सवयींमुळे कंटाळून जातात, मुलींच्या जवळही जाण्यास घाबरतात. पाहुया मुलींच्या अशा कोणत्या त्या सवयी असतात की ज्यामुळे मुलं त्यांच्यापासून चार हात लांब राहणंच पसंत करतात.

१. रुबाब दाखवणे
मुलांना नखरेल, कारण नसताना स्वतःचा रुबाब दाखविणाऱ्या आणि गर्विष्ठ मुली अजिबातच आवडत नाहीत. अशा स्वतःला जास्तच स्मार्ट समजणाऱ्या मुलींपासून दूरच राहणं मुलं पसंत करतात.

२. फुशारक्या मारणे
काही मुलींना आपल्याकडे काय काय आहे ते बोलून दाखविण्यात आनंद वाटतो. म्हणजे आपलं कुटुंब किती मोठं आहे, आपल्याकडे किती पैसा आहे, आपला किती नावलौकिक आहे याबद्दल त्या सतत बोलत असतात. मग यात त्यांचे नातेवाईकही येतात. जसे – माझे मामा अमेरिकेत राहतात, माझा चुलत भाऊ युरोपमध्ये मोठा व्यावसायिक आहे. अशा दुसऱ्यांच्या कर्तृत्वाच्या फुशारक्या मारून या मुली स्वतःला मोठं करू इच्छितात. मुलींची ही फुशारक्या मारण्याची सवयच काही मुलांना अजिबात आवडत नाही.

३. चुगली करणे/एकाचे दुसऱ्याला नि दुसऱ्याचे तिसऱ्याला जाऊन सांगणे
काही मुलींच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही. मग या मुली आपल्याला कळलेली गोष्ट मीठ-मसाला लावून, चढवून दुसऱ्यांना सांगतात. यालाच चुगली करणं असं म्हणतात. अशा स्वभावामुळे बरेचदा भांडणं वा गैरसमज होण्याची शक्यता असते. म्हणूनच मुलं या मुलींपासून दूर राहणेच पसंत करतात. अशा मुलींशी लग्न केल्यानंतर त्या आपल्या कुटुंबातही कलह निर्माण करतील अशी भिती त्यांना वाटते.

४. साधा अन् सरळ स्वभाव
काही मुलांना सरळ आणि साधा स्वभाव असलेल्या मुली आवडत नाहीत. का? तर त्या त्यांना त्यांच्या म्हणजे आधुनिक टाइपच्या वाटत नाहीत. काकूबाई अर्थात गावठी वाटतात. अशा मुलींसोबत आयुष्य घालवणं त्यांना कठीण वाटतं. तेव्हा मुलींचा साधा सरळ स्वभावही काही वेळा दुर्गुण ठरतो. मुलं त्यांना नापसंत करतात.

५. सतत रडणे, तक्रारीचा सूर असणे
काही मुलींना सतत काही ना काही खुसपट काढून कुढत बसण्याची सवय असते. आनंदाच्या क्षणीदेखील त्यांचा चेहरा रडका असतो. सतत तक्रारीचा सूर असतो. जगभरातील अनेक गोष्टींचं यांना वावडं असतं. मुलं अशा अतिशय भावुक आणि संवेदनशील मुलींपासून दूर राहणेच पसंत करतात.

६. मेकअप, सजण्याचं वेड
काही मुली दिवसातून अनेकदा आपला चेहरा धूत असतात, केस विंचरत असतात. सारखा मेकअप करतात. लिपस्टिक लावण्याचं तर त्यांचं वेड… विचारूच नका. या मुली प्रेमाचे बोल कमी आणि मेकअप, सौंदर्य प्रसाधनांबद्दलच अधिक बोलतात. त्यात भर म्हणून शॉपिंगची आवडही असते. अशा मुलींच्या वाऱ्यालाही उभं राहणं मुलं पसंत करत नाहीत.

७. सेल्फीप्रेमी
आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवावे अशी आवड असणाऱ्या काही मुली आहेत. आत्ता तर सेल्फीमुळे त्यांना त्यांची ही आवड पूर्ण करण्यासाठी चांगलीच संधी मिळालेली आहे. परंतु अशा सेल्फीप्रेमी मुलींसोबत असताना मुलांना मात्र प्रेयसीसोबत नाही तर फोटोग्राफीच्या दुकानासोबत आपण फिरत असल्यासारखे वाटते. कारण ते जेथे जेथे जातात, या मुली तेथील आठवणी जपून ठेवण्याच्या छंदापायी सारखे मोबाईलमध्ये फोटो काढत राहतात. त्यांच्या या वागण्याचा काही मुलांना राग येतो. आपल्याला काही खाजगी आयुष्यच नाही, याची त्यांना जाणीव होते.

८. मी कशी दिसते?
आपण कसे दिसतो हे मुलींना चांगलंच माहीत असतं. तरीही काही मुलींना अशी सवय असते की दुसर्‍यांना विचारायचं की मी कशी दिसते? त्यांची ही सवय मुलांना आवडत नाही.

९. कामसू (वर्कोहोलिक) मुली
काही मुली या अतिशय कामसू (वर्कोहोलिक) असतात. अशा मुलींपासून मुलं लांब पळतात कारण सतत कामात व्यस्त असणाऱ्या या मुली आपल्या कुटुंबीयांना आवश्यक तो वेळ देऊ शकत नाहीत. आपलं काम, नोकरी आणि बॉस यांसंबंधी गोष्टीच त्यांच्या डोक्यात सतत चालू असतात. या मुली आपल्या नात्यातील व्यक्तींना योग्य न्याय देऊ शकणार नाहीत, असं काही मुलांना वाटतं.