लग्नाआधी आई होण्याची घाई झालेल्या अभिनेत्री (9 ...

लग्नाआधी आई होण्याची घाई झालेल्या अभिनेत्री (9 Bollywood Actresses Who Were Pregnant Before They Got Married)

बॉलिवूडमधील कलाकार मंडळी मनमौजीसारखं आयुष्य जगत असतात. समाजाची वा घरच्यांची कुणाचीच रोकटोक त्यांना नको असते. आपल्या मर्जीप्रमाणं ते जगत असतात. आणि असं जगत असताना काही चुका घडल्याच तर त्यासहित आयुष्य घालविण्याची ताकदही ते ठेवतात. बॉलिवूडमधील अभिनेत्री ह्यांना प्रेम-लग्न-मूल असा क्रमच लागू होत नाही. आधी तर त्या विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडतात, मग लग्नाआधीच गरोदर राहतात आणि मग लग्नाचा बार उडवतात. पाहुया लग्नाआधी आई झालेल्या या अभिनेत्री…

श्रीदेवी: श्रीदेवीने कधीही आपण गरोदर असल्याचं लपवलं नाही. १९९६ मध्ये जेव्हा तिने बोनी कपूरशी लग्न केलं त्यावेळेस ती सात महिन्यांची गरोदर होती. आणि लग्नानंतर काही महिन्यांतच जान्हवीचा जन्म झाला. बोनी कपूर यांचे आधीच लग्न झालेले असल्यामुळे श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे लग्न व्हायला बराच वेळ लागला. त्याही परिस्थितीत बोनी कपूर यांचं आधी लग्न झालेलं आहे हे माहीत असूनही, श्रीदेवीने त्यावेळेस समाज तसेच समाजातील लोक यांची पर्वा न करता आपल्या बाळाला जन्म देण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.

नीना गुप्ता: लग्नाआधी एखाद्या स्त्रीने आई होणे हे समाजाला अमान्य होते त्यावेळेस नीना गुप्ताने लग्नाशिवाय आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. क्रिकेटर विवियन रिचर्डशी नीनाचे प्रेमसंबंध होते परंतु तो विवाहित होता. आणि त्यांच्या समाजात एक पत्नी असताना दुसरं लग्न करण्यास मनाई होती. त्यामुळे रिचर्डने नीनाशी लग्न केलं नाही परंतु मसाबाची जबाबदारी मात्र त्यानं पित्याप्रमाणे निभावली. मसाबा हे नीना व विवियन यांच्या मुलीचं नाव आहे, जी आता फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता म्हणून सुपरिचीत आहे. रिचर्ड आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन लग्न करु शकला नाही. परंतु नीनाने लग्न न करता मुलीला केवळ जन्मच दिला नाही तर तिला समाजात एक ओळख मिळवून दिली. तिच्या हिमतीची दाद द्यावयास हवी.

सारिका: कमल हसन आणि सारिका यांच्यातील प्रेमाचे किस्से खूपच लोकप्रिय ठरले होते. परंतु कमल हसन यांचं लग्न झालेलं असल्यामुळे सारिकाला घर तोडणारी तसेच दुसरेपणाची बायको अशा प्रकारच्या कटू शब्दांचा सामना करावा लागला होता. लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या सारिकाने त्या दोहोंमधील प्रेमाच्या निशाणीला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि श्रुतीचा जन्म झाला. एवढंच नाही तर या दोघांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळेस लग्न केलं. तेही लग्न फार टिकलं नाही पण लग्नाआधी मुलीला जन्म देण्याच्या सारिकाच्या निर्णयावर त्यावेळेस बरीच चर्चा झाली.

कोंकणा सेन: कोंकणा सेनचं लग्न सप्टेंबर २०१० ला झालं आणि मार्च २०११ मध्ये तिला मुलगा झाला. याचा अर्थ कोंकणा ही लग्नाआधीच गरोदर होती. आता रणबीर शौरी आणि कोंकणा यांचा घटस्फोट झालेला असला तरी त्यांच्या लग्नाच्या वेळेस आणि लग्नानंतर लगेचच आलेल्या पालकत्वाच्या जबाबदारीमुळे ते दोघेही चर्चेचा विषय झाले होते.

महिमा चौधरी: महिमाने इतक्या घाईघाईत लग्न केलं की त्यावेळेस कोणाच्या लक्षातही आलं नाही. पण नंतर लगेचच तिने मुलाला जन्म दिल्यानंतर सगळ्यांना कळलं की महिमा लग्न होण्याअगोदरच गरोदर होती. म्हणूनच तिने प्रियकर बॉबी मुखर्जीशी लगेच लग्न केलं.

अमृता अरो़राः मलायका अरोराची छोटी बहीण अमृताने घाईघाईत लग्न करून लगेचच आपल्या गरोदरपणाची बातमी दिली तेव्हाच सगळ्यांना अंदाज आला की अमृता लग्नाआधीच गरोदर होती. घाईघाईत केलं जाणारं लग्न हे नेहमीच गॉसिपींगचा विषय झालेला आहे.

सेलिना जेटली: दुबई स्थित हॉटेल व्यावसायिकाशी सेलिनाने लग्न केलं आणि लगेचच ती गरोदर असल्याची खबर सर्वत्र पसरली. कारण सेलिनाही लग्नाआधीच गरोदर होती.

नेहा धूपिया: अंगद बेदीशी लग्न करण्याआधीच नेहा गरोदर होती आणि ही बातमी खुद्द अंगदनेच दिली. नेहाने लग्नाआधी गरोदर असल्याचे घरी सांगितल्यानंतर तिला घरातून बराच दम मिळाला होता, असंही अंगद सांगतो.

ट्विंकल खन्ना: अक्षय कुमारशी बरीच वर्षं डेट केल्यानंतर ट्विंकलने त्याच्याशी लग्न केलं. आजही ती दोघं आपल्या खाजगी आयुष्यात मजेत आहेत. परंतु ट्विंकल आणि अक्षयच्या लग्नाच्या वेळेस अशी खबर चर्चेत होती की ट्विंकल ही लग्नाआधीच गरोदर होती म्हणजेच लग्नाच्या वेळेस आरव हा ट्विंकलच्या गर्भात होता.