‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिक...

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेचे ८०० भाग (800 Episodes Of Saint Balumama’s Bioepic On T.V.)

गेली २ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मराठी मालिकेने ८०० भागांचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्रातील दक्षिण भागात, विशेषतः सोलापूर परिसरात देवावतार म्हणून गाजलेल्या बाळूमामा या संत पुरुषाच्या जीवनावर आधारित असलेली ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर गाजते आहे.

आता बाळूमामा हे समस्त महाराष्ट्राचं श्रद्धास्थान झालं आहे. अशा या बाळूमामांच्या अगाध लीलांची गाथा संतोष अयाचित यांनी सादर केली आहे.

दिनदुबळ्यांचा कैवार घेणारे, गरीबांचे प्रतिनिधीत्व करणारे, भक्तांच्या हाकेला धावून जाणारे बाळूमामा यांच्या चरित्रग्रंथातील लीला, त्यांनी ज्या भक्तांचा उद्धार केला, अशांच्या सुरस कथा या मालिकेतून मांडण्यात आल्या आहेत.

बाळूमामांची भूमिका सुमित पुसावळे यांनी केली आहे.