ब्लाऊज न घालता साडी नेसलेल्या ८ हॉट अभिनेत्री (...

ब्लाऊज न घालता साडी नेसलेल्या ८ हॉट अभिनेत्री (8 Hot Actressess Who Wore Saree Without Blouse)

काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राने एका फोटो शूटसाठी ग्लॅमरस गोल्ड साडी नेसली होती. पण त्यावर ब्लाऊज मात्र घातले नव्हते. साडीविषयी मात्र तिने बरंच काही लिहिलं होतं. साडी नेसल्यावर खूप शालीन वाटतं वगैरे. पण लोकांना तिचं हे रूप आवडलं नाही, अन्‌ त्यांनी चांगलेच शालजोडीतले शेरे ठेवून दिले. एक यूजर म्हणाला, लोकांना मूर्ख बनवून तू कशाला गोंधळात पाडते आहेस? तू जे नेसली आहेस, त्याला साडी म्हणताच येणार नाही… तर दुसरा म्हणाला, ही काही आपली संस्कृती नव्हे. हिला अशा चुकीच्या पद्धतीने नेसू नकोस.

ब्लाऊज न घालता साडी नेसण्याचा असाच पराक्रम ऐश्वर्या राय बच्चनने केला आहे. २००३ साली आलेल्या ‘चोखेर बाली’ या बंगाली चित्रपटात तिने अशई धिटाई दाखवत साडी नेसली होती. या चित्रपटात ऐश्वर्याने एका विधवा तरुणीचे पात्र रंगवले होते. त्यासाठी तिने हे लूक स्वीकारले. ज्याची तेव्हा खूपच चर्चा झडली होती. मात्र या रूपात ऐश्वर्या खूपच शालीन दिसली होती. म्हणून लोकांना ते खूपच आवडलं.

गिजेल ठकराल, ही फारशी प्रसिद्ध नसलेली नटी बिग बॉसच्या ९ व्या भागात एक स्पर्धक होती. आपले हॉट रूप आणि त्याचे फोटो, याबद्दल गिजेल प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिच्या या पातळ पांढऱ्या साडीतील फोटोंनी इंटरनेटवर जणू आग लावली.

मंदाकिनीने ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात झिरझिरीत साडी नेसून धबधब्याच्या धारांमध्ये एक गाणं गायलं होतं. त्या ओलेत्या रुपाची गिजेलने नक्कल केली व सोशल मीडियावर शेअर केले. पण चाहत्यांना काही ते पटलं नाही. जरा चांगले कपडे घालत जा… अशा कमेंटस्‌ दिल्या. त्याचबरोबर काही फॅन्सनी तिच्या सेक्सी फिगरची तारीफ केली होती.

मंदाकिनीचा विषय निघालाच आहे तर तिने नेसलेल्या बिनब्लाऊज साडीचा उल्लेख करायला काय हरकत आहे. ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटात मंदाकिनीने ब्लाऊज न घालता झिरझिरीत पांढरी साडी नेसून आपल्या अंगप्रत्यंगांचे दर्शन घडविले होते. त्याची ज्याच्या त्याच्या तोंडी चर्चा तेव्हा रंगली होती. काहींना तिचे हे दृश्य सेक्सी तर काहींना निलाजरेपणाचे वाटले होते.

मंदाकिनीच्या आधी राज कपूर यांच्याच ‘सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरम्‌’ या चित्रपटात झीनत अमानने पारदर्शी पांढरी साडी घालून धबधब्याखाली अंघोळ करण्याचा नि ओलेती अवस्थेत पुढे देवळात जाण्याची दृश्ये देऊन बरीच खळबळ माजवली होती. त्या काळात अशी ओलेती दृश्ये देण्याचे झीनतने मोठे धाडस केले होते. ब्लाऊज शिवाय साडी नेसण्याचे झीनतने केलेले हे धाडस काळाच्या बरेच पुढे होते.

सौंदर्या शर्मा ही गुणी अभिनेत्री आहे. तेवढीच सेक्सी देखील आहे. करोनाच्या संसर्ग काळात तिने सोशल मीडियावर अमेरिकेतून धाडलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. त्यातलं एक होतं ब्लाऊज न घालता, साडी नेसलेलं छायाचित्र. त्यात सौंदर्या, बऱ्यापैकी सुंदर दिसली होती. पण काही लोकांनी तिला म्हटलं होतं की, बाई गं तुला जमत नाही तर कशाला साडी नेसतेस?

राधिका आपटे आपलं धाडस दाखविण्याची संधी सहसा सोडत नाही. टॉपलेस अवस्थेत तर ती अवतरली आहेच. पण कथानकाची मागणी, या सबबीखाली तिने ब्लाऊज न घालता साडी घालण्याचे धाडस दाखविले आहे. शॉर्ट फिल्मस्‌ची एक मालिका ती चित्रित करत होती. त्यामध्ये ऐश्वर्या रायचे ‘चोखेर बाली’ वाले लूक दाखवायचे होते. त्यात राधिका पुढेच गेली.

बिग बॉसच्या १४ व्या भागातली एक स्पर्धक पवित्र पुनिया टी.व्ही. सृष्टीत नामचीन झालेली आहे. ‘डायन’ या मालिकेत ती ब्लाऊज न घालता, साडी नेसून ज्या बिनदिक्कतपणे वावरली होती, ते पाहून लोकांची शुद्ध हरपली होती. कारण कोणत्याही टी. व्ही. कलावतीने इतक्या बिनधास्तपणे अंगप्रदर्शन केले नव्हते. या अवतारात तिच्या उघड्या पाठीवरील टॅटूने लोकांची नजरबंदी केली होती म्हणा ना. ब्लाऊज कुठे आहे? अशी विचारणा काही लोकांनी केली तर आणखी काही जण म्हणाले, काही लाज आहे का?