वजन कमी करणारे ८ हेल्दी स्नैक्स (Weight Loss Ti...

वजन कमी करणारे ८ हेल्दी स्नैक्स (Weight Loss Tip Of The Day: 8 Healthy Snacks For Weight Loss)

वजन कमी करणं खरोखर अवघड काम आहे. विशेषतः त्यांच्यासाठी ज्या व्यक्तींचा आपल्या जिभेवर ताबा नाही. अशा परिस्थितीमध्ये स्नॅक्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. वजन कमी करत असताना सकस आणि सात्विक स्नॅक्स खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि बराच काळ भूक लागत नाही. अशाच काही स्नॅक्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचं वजन आटोक्यात ठेवू शकता.

१ ॲपल ॲण्ड पीनट बटर

फायबर अधिक प्रमाणात असलेलं सफरचंद वजन कमी करण्याकरिता अगदी उत्तम ठरतं. सफरचंद आणि पीनट बटर यांचं कॉम्बीनेशन अतिशय पौष्टीक स्नॅक्स आहे. पीनट बटरमध्ये उच्च प्रमाणात कॅलरीज असतात. आणि पीनट बटर कमी साखरेच्या पदार्थांसोबतही खाता येतं.

२. रोस्टेड चिकपीज

काबुली चण्यामध्ये  अधिक प्रोटीन आणि उच्च कार्बोहायड्रेट असतात. परंतु कॅलरीज कमी असतात. यास मोड आणूनही खाता येतात. किंवा चणे उकडून त्यात ऑलिव्ह तेल आणि मीठ घालूनही खाता येतं.

३. स्मूदी

वजन कमी करण्याच्या दरम्यान हिरव्या भाज्यांची स्मूदी एक उत्तम पर्याय आहे. या स्मूदीमध्ये पालक, फ्रोझन मँगो, दूध आणि आळशी घालून ती आणखी पौष्टिक व हेल्दी बनवता येते

४. नट्‌स

वजन कमी करताना मिक्स नट्‌स हा आदर्श स्नॅक्स आहे. विशेषतः बदाम आणि डाळिंब हा एकदम परफेक्ट स्नॅक्स आहे. डाळिंबामध्ये जीवनसत्त्व बी, सी आणि के असतंच शिवाय अँटीऑक्सीडंट्‌स असतात जे आरोग्यासाठी लाभदायक असतात. यातील पाणी आणि फायबर त्वचेस आर्द्रता देते. तसेच खाण्याबाबतची लालसा कमी करते.

५. बेक्ड स्वीट पोटॅटो

पाणी आणि फायबरने भरलेला आणि लो कॅलरी असलेला स्वीट पोटॅटो हा वजन कमी करण्यासाठीचं सुपर फुड आहे. तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी स्वीट पोटॅटो खात असाल तर त्यात नट्‌स आणि सीड्‌सही घालू शकता.

६. पनीर आणि रासबेरी

लो कॅलरी आणि लो कार्बमुळे पनीर खाल्ले की वेगाने वजन कमी होते. वजन कमी करताना अधिक फायबर हवे असतील तर पनीर सोबत रासभेरी खा.

७.. ओटमील विद्‌ सिनेमॉम

तुम्ही वजन कमी करण्याकरिता आहार घेत आहात तर ओटमील हा बेस्ट चॉइस आहे. यात बीटा ग्लूकन भरपूर असतं, हे विरघळून जाणारं फायबर असतं. यामुळे भूक कमी होते. यास दूधात शिजवून खाता येतं आणि अधिक चवीष्ट बनविण्यासाठी यात ताजी फळं घालता येतात.

८. पिस्ता

लो कॅलरी असलेला हा स्नॅक्स प्रोटीन आणि फायबरने भरलेला असतो. हे ग्रीन नट्‌स पचनक्रिया वेगाने करतं आणि मधुमेहामधेही लाभदायक असतं. यामधील हेल्दी फॅट्‌समुळे लवकर तृप्तता लाभते आणि भूक कमी होते.