८ बॉलिवूड कलाकारांनी पोस्ट केले त्यांचे असली फो...

८ बॉलिवूड कलाकारांनी पोस्ट केले त्यांचे असली फोटो (8 Bollywood Stars Posted Their Unedited And Unfiltered Pictures)

बॉलिवूड कलाकारांना आपलं सौंदर्य आणि फिटनेस यांबाबत सतत सतर्क असावं लागतं. त्यामुळे
त्यांचा हरेक लूक हा फोटोजेनिक असतो. परंतु असेही काही कलाकार आहेत, जे चाहत्यांसमोर
आपला खरा चेहरा दाखवायला जराही घाबरत नाहीत. पाहुया हे कलाकार कोण आहेत, ज्यांनी
आपल्या चाहत्यांना आपला खरा चेहरा दाखविण्यासाठी सोशल मिडियावर त्यांचे काही अप्रकाशित आणि सुधारणा न केलेले फोटो पोस्ट केले आहेत.

१) करीना कपूर खान
करीना कपूर खान अलीकडेच सोशल मिडिया वर ॲक्टिव झाली आहे. अन्‌ तिने आपल्या
चाहत्यांसाठी सोशल मिडियावर आपला खरा आणि यापूर्वी प्रसिद्ध न झालेला फोटो शेअर केला
आहे. या फोटोमध्ये तिची त्वचा इतकी सुंदर दिसते की तिला मेकअप करण्याची गरजच नाही.

२) लीसा रे
लीसा रे ने स्वतःचा अप्रकाशित फोटो शेयर करून असं म्हटलं आहे की, या फोटोमध्ये मी ४७
वर्षांची आहे. अगदी खरीखुरी. आपण जसे आहोत तसे दिसावे यासाठी आग्रही असण्याची हिंमत
सगळ्यांत असते का? असं ती विचारते. लिसा रे ने कॅन्सरसारख्या आजारावर मात केली आहे
तसेच आपलं आयुष्यही ती स्वच्छंदीपणे जगली आहे. तिचा हा फोटोच सांगतो की ती कोणत्याच
गोष्टीला घाबरत नाही, तसेच हार-जितचीही तिला आता भिती वाटत नाही.

३) आमिर खान
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या लुकसाठी कायम चर्चिला गेला आहे. तो आपल्या
दिसण्यावर अनेक प्रयोग करून पाहत असतो. अलीकडेच त्याची मुलगी ईरा खानने आपल्या
वडिलांसोबतचा हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात आमिरचे पांढरे झालेले केस
दिसत आहेत. तसेच बाप-लेकींमधील प्रेमळ नातंही दिसत आहे

४) समीरा रेड्डी
मागील बऱ्याच काळापासून समीरा रेड्डी बॉलिवूडपासून दूर आहे. समीरा रेड्डी नेहमी नॅचरल वाटते. त्यामुळेच सोशल मिडियावर तिचे अनेक चाहते आहेत. अलीकडे समीराने आपला पिकलेल्या केसांतला फोटो शेअर करत एक छानसा मेसेजही लिहिला आहे. समीराचा हा लुकही तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

५) कल्कि कोचलिन
कल्कि कोचलिनने सोशल मिडियावर जो फोटो शेअर केला आहे तो पाहून लोकांना आता सुंदरता
पाहताना आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे असं वाटतंय. कल्किचा हा फोटो बऱ्याच
विचारांना फाटे देणारा आहे.

६) करण जोहर
करण जोहरनेही सोशल मीडियावर आपला अप्रकाशित फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये
करणमधील कूल डॅडी दिसत आहे. करण बरेचदा वेलड्रेस्ड असतो आणि या फोटोमध्येही त्याने
आपल्या केसांची सफेदी नीटनेटकी ठेवलेली दिसत आहे.

७) कुब्रा सेठ
सेक्रेड गेम्स या वेबसीरीज़मधील अभिनयामुळे लोकप्रिय झालेली कुब्रा सेठने सोशल मिडियावर आपला मेकअप नसलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिसणारा तिचा आत्मविश्वास कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही.

८) दीपिका पादुकोण
वोग या एका प्रतिष्ठीत मॅगजीनच्या शूटसाठी दीपिका पादुकोणने आपल्या खऱ्या लुकचा फोटो
शेअर केला. या फोटोमधील दीपिकाचं नॅचरल सौंदर्य चाहत्यांना अतिशय आवडलं.