८ बॉलिवूड स्टार्सचा मुक्या प्राण्यांवर जडलाय्‌ ...

८ बॉलिवूड स्टार्सचा मुक्या प्राण्यांवर जडलाय्‌ जीव (8 Bollywood Celebrities Who Love Pets See Their Adorable Pictures)

बॉलिवूड मधील काही वलयांकित कलाकारांनी आपल्या घरात कुत्रे आणि मांजरी पाळल्या आहेत. या मुक्या प्राण्यांवर त्यांचा खूपच जीव जडलाय्‌. त्यांचे लाड करीत असलेले फोटो ते सोशल मीडियावर टाकत असतात. आपल्या पेट्‌सवर प्रेम करणाऱ्या या स्टार्सची आपणही खबर घेऊया.

१.प्रियंका चोप्रा

देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि तिचा विदेशी पती निक जोनास यांनी ३ कुत्रे पाळले आहेत. पांडा – गिनो – डॉयना अशी त्यांची नावे आहेत. प्रियंका आणि निक या तिघांवर जीवापाड प्रेम करतात. इन्स्टाग्रामवर ते या कुत्र्यांचे फोटो शेअर करत असतात.

२.सलमान खान

सलमान खानला आपल्या प्रेयसी बदलण्याचा छंद आहे, पण त्याच्याकडे जे कुत्रे आहेत, त्यांना मात्र त्याने बदलले नाहीत. कारण त्यांना या कुत्र्यांची माया जडली आहे. आपले फुरसतीचे क्षण तो घरातील माणसे, मित्र आणि या कुत्र्यांच्या संगतीत घालवतो. या फोटोंमधून सलमानचे या पाळीव प्राण्यांवर असलेले प्रेम प्रतीत होताना दिसत आहे. मायसन व मायजन नावाचे २ व आणखी ३ कुत्रे आहेत. या ५ कुत्र्यांशी तो अतिशय प्रेमाने वागतो.

३.आलिया भट्ट

आलिया भट्टचे मुक्या प्राण्यांबद्दलचे प्रेम जगजाहीर आहे. मात्र तिने आपल्या विरंगुळ्यासाठी छान छान मांजरी पाळल्या आहेत. तिचे हे मांजर प्रेम लोकांनाही आवडते. या मांजरींबरोबर खेळत असतानाचे आपले फोटो आलिया सोशल मीडियावर शेअर करत असते.

४.अनुष्का शर्मा

आपला आवडता कुत्रा डूड याच्याशी खेळतानाचे अनुष्का शर्माचे फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. शूटिंग चालू असताना ती या डूडला सेटवर घेऊन जात असते. माझा खराब मूड हा कुत्रा ठीक करतो, असं अनुष्का आवर्जून सांगते.

५.श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूरला कुत्री खूप आवडतात. रस्त्यावरील कुत्रे आणि मांजरी यांच्यासोबत देखील ती बरेचदा दिसते. तिच्याकडे शॉयलोन नावाचा कुत्रा आहे. हा आपला स्ट्रेस बस्टर आहे, असं श्रद्धा सांगते.

६.सोनम कपूर

सोनम कपूरला कुत्री बेहद्द आवडतात. तिला फुरसत असली की, ती आपल्या कुत्र्यांमध्ये जीव रमवते. या कुत्र्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

७.कृती सनान

कृती सनानला आपली कुत्री खूप आवडतात. तिच्याकडे दोन गोड कुत्री आहेत. त्यांच्यावर तिने खूप जीव जडवला आहे. त्यापैकी एकाचे नाव डिस्को ठेवले आहे. आपल्या फोटोंसह कृती या पेट डॉग्ज्‌चे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

८.जॉन अब्राहम

जॉन अब्राहम देखील आपल्या दोन कुत्र्यांवर खूप प्रेम करतो. इतकं की, त्याने बेली आणि सिया या कुत्र्यांच्या नावाने इन्स्टाग्राम पेज बनविले आहे. विशेष म्हणजे या दोघांचे हजारो फॉलोअर्स आहेत. जॉनची आपल्या या दोन पाळीव प्राण्यांवर खूप माया जडली आहे. त्याचे हे प्रेम सोशल मीडियावर प्रतीत होत असते.

सर्व छायाचित्रे – इन्स्टाग्रामच्या सौजन्याने.