७ गर्भवती महिलांच्या बाळंतपणाच्या कथा दाखविणारी...

७ गर्भवती महिलांच्या बाळंतपणाच्या कथा दाखविणारी मालिका ‘वंडर विमेन’ ( 7 pregnant women’s journey to their delivery is the content of new web series ‘wonder women’)

वेब सिरीजमधून वेगळ्या विषयांचे सादरीकरण करण्याची स्पर्धा सध्या जोरात आहे. सोनी लिव्ह च‌ॅनलवर 18 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ‘वंडर विमेन’ या नव्या मालिकेचा विषय असाच काहीसा वेगळा आहे. विभिन्न पार्श्वभूमी लाभलेल्या ७ गर्भवती महिलांचा गर्भारपण ते बाळंतपणाचा प्रवास त्यात दाखविण्यात आला आहे. या महिलांच्या प्रसूतीपूर्व शंका – कुशंका, समस्या, गोंधळ यांचे चित्रण या मालिकेत आहे.

अंजली मेनन यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष प्रमुख भूमिकेत असून तिचे पती संदेश कुलकर्णी हे तिचे नायक झाले आहेत. नित्या मेनन, पार्वती थिरुवोथू, नदिया मोयडू, पद्मप्रिया जनकिरमन, सायोनारा फिलीप, अर्चना पद्मिनी या इतर नायिका आहेत. ही मालिका हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा ७ भाषांत तयार करण्यात आली आहे.

अमृता सुभाषने इथे जया नामक पुराणमतवादी महाराष्ट्रीयन महिलेची भूमिका केली आहे. माझ्यासाठी ही भूमिका अद्वितीय आहे. कारण वास्तविक जीवनातील माझ्या पतीनेच यात माझ्या पतीची भूमिका साकारली आहे. जया ही महिला प्रत्येक गोष्टीसाठी पतीवर खूपच अवलंबून असते, पण ती उपचारासाठी केरळला जाते आणि स्थिती बदलते, अशी प्रतिक्रिया अमृता सुभाषने दिली.