बॉलिवूडच्या या ७ तारकांप्रमाणे वापरा लेअरिंग वि...

बॉलिवूडच्या या ७ तारकांप्रमाणे वापरा लेअरिंग विंटर वेअर (7 Bollywood Actresses Show You How To Layer Up For Winter)

कोणतीही नवीन फॅशन आली की बॉलिवूडमधील तारकांकडून ती आपल्यापर्यंत पोहोचतेच. ऋतूमानाप्रमाणे, सणवाराप्रमाणे त्या नवनवीन पेहरावांच्या फॅशनचे प्रदर्शन करत असतात. अलिकडेच या ७ सिनेतारकांनी विंटर वेअरचे प्रदर्शन केलेले आहे. ते पाहून तुम्हीही ही फॅशन आजमावून पाहू शकता. थंडीच्या मोसमात लेअरिंग फॅशनची मजा काही औरच आहे. जर तुम्हाला योग्य पद्धतीने लेअरिंग करता आलं, तर तुम्हीदेखील या मोसमात स्वतःचा वेगळा लूक निर्माण करू शकता आणि स्वतःला स्टायलिश बनवू शकता. त्यासाठी या बॉलिवूड तारकांच्या विंटर फॅशन ट्रीक्स फॉलो करून पाहा.

१.दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोण प्रमाणे स्नीकर्स, ट्रॅक पँट, टीशर्टसोबत मिड लॉन्ग कार्डिगन घालून तुम्ही मस्त, ऊबदार आणि आरामदायक लुक मिळवू शकता. थंडीच्या मोसमात लेअरिंगचं हे कॉम्बिनेशन तुम्हाला स्टायलिश लूक देईल.

२. प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्राप्रमाणे लेअर वर लेअर घालून तुम्ही स्वतःचा इतरांहून अलग लूक निर्माण करू शकता आणि थंडीपासून बचावही करू शकता. या फॅशनसाठी तुम्ही स्टायलिश टीशर्ट, शाल, जॅकेट, टोपी, जीन्स आणि बुटांचा वापर करून पाहू शकता.

३. सोनम कपूर
सोनम कपूरप्रमाणे प्लेन मॅक्सी ड्रेस किंवा सलवार-कमीजसोबत फ्लोरल प्रिंटचं जॅकेट घालून तुम्ही स्वतःची वेगळी स्टाईल निर्माण करू शकता.

४. आलिया भट्ट
आलिया भट्टसारखा मुलीचा लूक हवा असेल तर शॉर्ट्स सोबत लाँग जॅकेट हे कॉम्बिनेशन वापरून पाहा. या लूकसोबत स्नीकर्स घाला, यामुळे तुम्ही आणखीनच स्मार्ट दिसू लागाल.

५. परिणीति चोप्रा
 परिणीति चोप्रासारखे शॉर्ट्‌ससोबत लाँग जॅकेट घाला आणि स्मार्ट विंटर लूक मिळवा.

६. अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माने आपल्या नेहमीच्या जीन्ससोबत डेनिम जॅकेट घातलं आहे. या पेहरावासोबत तुम्ही स्ट्राइप्ड शर्ट वा टीशर्ट घालून स्वतःचा स्टायलिश लूक बनवू शकता.

७. कंगना रणौत
तुम्हाला कंगनासारखं स्टाईल दिवा बनायचं असेल तर तिच्यासारखं स्किनी पँट, स्मार्ट शर्ट वा टीशर्ट सोबत लाँग जॅकेट आणि क्लासी फुटवेअर वापरा.