आज पोळा! … त्या निमित्ताने शेती आणि शेतकऱ...

आज पोळा! … त्या निमित्ताने शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे ६ हिंदी चित्रपट (6 Hindi Movies Depicting The Problems Of Farmers On The Occasion Of Bull’s Festival)

आज पोळा! अर्थात बैलांचा सण! त्यामुळे याला बैलपोळा असेही म्हटले जाते. आपल्या कृषीप्रधान देशात शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याचा मोठा भार बैल उचलत असतो. त्यामुळेच श्रावण या पवित्र महिन्याची सांगता करणाऱ्या अमावस्येस पोळा साजरा केला जातो. या दिवशी बैलांना नांगरास जुंपले जात नाही किंवा बैलगाडीचे जोखड त्याच्या मानेवर ठेवले जात नाही. या सणाला शेतकरी बांधव बैलाची पूजा करतात. त्याला न्हाऊमाखू घालतात. गोडाचा नैवेद्य दाखवतात. अंगावर झूल घालतात.

या सणाच्या निमित्ताने बॉलिवूडच्या चित्रपटांमधील शेती व शेतकऱ्यांच्या समस्या दाखविणाऱ्या चित्रपटांची ही झलक….

१ – मदर इंडिया

Problems Of Farmers, Bull's Festival

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

१९५७ साली आलेल्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटात देशातील गरीब शेतकरी आणि त्याच्यापुढील आव्हाने दाखवण्यात आली आहेत. मेहबूब खान दिग्दर्शित या चित्रपटात गरिबी आणि उपासमारीशी झुंजणाऱ्या एका महिला शेतकरीची कथा दाखवण्यात आली आहे. यात नर्गिस दत्त, राज कुमार, सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

२ – दो बिघा जमीन

Problems Of Farmers, Bull's Festival

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय दिग्दर्शित ‘दो बिघा जमीन’ हा चित्रपट एका कर्जबाजारी शेतकऱ्याची कथा आहे, त्याच्याकडून त्याची जमीन हिसकावली गेली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका शेतकऱ्याची कथा मांडणाऱ्या या चित्रपटात बलराज साहनी आणि निरुपा रॉय यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

३ – उपकार

Problems Of Farmers, Bull's Festival

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता मनोज कुमार यांच्या ‘उपकार’ या चित्रपटात त्यांनी एका शेतकऱ्याची भूमिका साकारली होती. ‘जय जवान, जय किसान’ या घोषवाक्याची झलक या चित्रपटात स्पष्ट दिसत आहे. शेतकरी बनलेल्या मनोज कुमारने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

४ – लगान

Problems Of Farmers, Bull's Festival

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाल केली. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिश कसे शेतकऱ्यांकडून भाडे वसूल करून त्यांचे शोषण करत असत? हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान व्यतिरिक्त ग्रेसी सिंगने मुख्य भूमिका साकारली होती.

५ – पीपली लाइव

Problems Of Farmers, Bull's Festival

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘पीपली लाईव्ह’ चित्रपटात गरिबी आणि दुःखांशी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांची वेदनादायक कथा मांडण्यात आली आहे. आमिर खानच्या निर्मितीमध्ये बनलेला हा चित्रपट गरिबीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या बाबत माध्यमांकडून घडणाऱ्या ढिसाळ कृत्यावर टीका करणारा आहे. हा चित्रपट अनुषा रिझवी यांनी दिग्दर्शित केला होता, जो प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

६- कडवी हवा

Problems Of Farmers, Bull's Festival

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

देशातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी अस्वस्थ होतात. ‘कडवी हवा’ हा चित्रपट देशातील दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय चांगल्या प्रकारे प्रकाश टाकतो. नीला माधव पांडा दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर शोरे, संजय मिश्रा, तिलोत्तमा शो सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.