सुट्टीच्या हंगामामध्ये मधुमेहाची काळजी घेण्यासा...

सुट्टीच्या हंगामामध्ये मधुमेहाची काळजी घेण्यासाठी ५ सूचना (5 Steps To Take Care Of Your Diabetes During The Forthcoming Vacation)

लवकरच नाताळाच्या सण आणि त्याला जोडून येणारे नववर्ष म्हणजे उत्साहाचा, मौजमस्तीचा काळ. या सणाच्या निमित्ताने सुट्ट्यांचा हंगाम येत असल्याने सारेजण धमाल करण्याच्या मुडमध्ये असतात. या हंगामात मा‌त्र मधुमेह असलेल्या रुग्णांनी स्वतः ची काळजी घेतली पाहिजे. गोडधोड व तळलेल्या पदार्थांचा मोह आवरुन स्वतः ची काळजी कशी घ्यावी, याबाबत मुंबई येथील डॉ.  मिता साहा यांनी या सूचना दिल्या आहेत.
यंदाच्‍या सणासुदीच्‍या हंगामामध्‍ये तुमच्‍या शरीरामधील ग्‍लुकोज पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी ५ सूचना:  
१.  आरोग्‍यदायी आहार: तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जाण्यापूर्वी काय खाणार याची योजना तयार करा. फॅट्स, साखर व मीठ यांचे सेवन मर्यादित करा आणि कर्बोदकांच्‍या सेवनावर लक्ष ठेवा. दिवसभरात थोड्या प्रमाणात भोजन करा. मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी आहार संतुलित आणि पौष्टिक राहील याची खात्री घ्‍या, डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्‍ला घ्‍या. हे देखील लक्षात ठेवा की जेवण वगळून इतर खाद्यपदार्थांचे मनसोक्‍त सेवन करू नका, कारण यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण धोकादायकरित्‍या कमी-जास्‍त होऊ शकते.

२.   रक्‍तातील शर्करेमध्‍ये होणाऱ्या कमी-जास्‍त प्रमाणाकडे लक्ष ठेवा: सुट्टीच्‍या हंगामामध्‍ये तुमची जीवनशैली व आहारामध्‍ये बदल होतात, ज्‍यामुळे नियमितपणे रक्‍तातील शर्करेच्‍या प्रमाणावर देखरेख ठेवणे आवश्‍यक आहे. फ्रीस्‍टाइल लिब्रे सिस्‍टमसारखे ग्‍लुकोज मॉनिटरिंग डिवाईस जवळ असल्‍यास तुम्‍हाला या पातळ्यांवर देखरेख ठेवण्‍यास मदत होऊ शकते. फिंगर प्रिक्‍ससाठी सुलभ व वेदनारहित पर्याय म्‍हणून हे डिवाईसेस वेअरेबल सेन्‍सर्स वापरतात, ज्‍यामुळे तुम्‍हाला रक्‍तातील शर्करेच्‍या प्रमाणावर देखरेख ठेवण्‍यास मदत होते. यामधून तुम्‍हाला धोकादायक आजार (हायपोग्‍लायसेमिया किंवा हायपरग्‍लायसेमिया) टाळण्‍यासाठी किंवा त्‍यासंबंधी काळजी घेण्‍यासाठी उत्तम सुविधा मिळू शकते.

३.   झोपेच्‍या चक्राचे व्‍यवस्‍थापन करा: पार्टीमुळे कधी-कधी रात्री उशीर होतो, ज्‍यामुळे पुरेशा झोपेच्‍या प्रमाणावर परिणाम होतो. वेळ काढून झोपेचे वेळापत्रक तयार करा, दिवसातून किमान सात ते आठ तास झोप मिळणे गरजेचे आहे. डुलकी घेतल्‍यास तुम्‍हाला मधुमेहावर उत्तमप्रकारे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होऊ शकते (अधिक झोपल्‍याने देखील इन्‍सुलिन प्रतिरोध वाढते, ज्‍यामुळे उठल्‍यानंतर तुम्‍हाला अधिक भूक लागते आणि खाल्‍ल्‍यानंतर पोट भरल्‍यासारखे वाटते).

४.   व्‍यायाम करा: नियमितपणे व्‍यायाम करत सक्रिय राहिल्‍याने मधुमेहाचे उत्तमरित्‍या व्‍यवस्‍थापन करता येते. सणासुदीच्‍या हंगामादरम्‍यान तुम्‍ही दिवसभरात अनेक कार्यक्रम व कुटुंबिय किंवा मित्रांना भेटी यामध्‍ये व्‍यस्‍त राहता, ज्‍यामुळे नियमितपणे फिटनेस वेळापत्रकाचे पालन करणे अवघड होऊन जाते. शारीरिक व्‍यायामासह पुन्‍हा उत्‍साहित होण्‍यासाठी तुम्‍ही चालणे, फूटबॉलसारखे सांघिक खेळ खेळणे, नृत्‍य (झुम्‍बा), सायकल चालवणे किंवा पोहणे असे व्‍यायाम करू शकता. याचे अनेक फायदे असू शकतात, जसे ऊर्जा पातळी वाढते, स्‍नायू बळकट होतात, फुफ्फुसाची क्षमता व रक्‍ताभिसरण वाढते, कोलेस्‍ट्रॉल पातळ्या कमी होतात, तणाव दूर होतो, तसेच रक्‍तातील शर्करेचे प्रमाण कमी होते.

५.  हायड्रेटेड राहा: सामान्‍यत: हायड्रेटेड राहणे चांगल्‍या आरोग्‍यासाठी महत्त्वाचे असते. मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी डिहायड्रेशन टाळण्‍याकरिता अधिक प्रमाणात पाणी प्‍यावे, ज्‍यामुळे रक्‍तातील शर्करेचे प्रमाण त्‍वरित कमी होते. सोबत पाण्‍याची बाटली असणे उपयुक्‍त ठरते.

या सूचना लक्षात ठेवण्‍यासोबत डॉक्‍टरांसोबत उपायांबाबत सल्‍लामसलत केल्‍याने तुम्‍हाला मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होऊ शकते. ज्‍यामुळे यंदा सुट्टीच्‍या हंगामामध्‍ये आरोग्‍यदायी व स्वस्थ जीवनाचा आनंद घेता येईल!