जोडीदारासोबतचे वाद कसे हाताळावेत, या ५ टीप्स वा...

जोडीदारासोबतचे वाद कसे हाताळावेत, या ५ टीप्स वापरून पाहा (5 Smart Ways To End An Argument With Your Partner)

सध्याच्या वर्तमान स्थितीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की बहुतांशी लोक हे अधीर होत चालले आहेत. दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची क्षमताच यांच्यात कमी होत चालली आहे. आपणच बरोबर हे सिद्ध करण्यासाठी अट्टहास केला जाताना दिसताहे. थोडक्यात आपण दुसऱ्यांच्या भावना समजून घेणेच सोडून दिले आहे. त्यामुळे नात्यामध्ये कटूता येऊ लागली आहे. याच कारणामुळे विवाहित जोडप्यांमध्ये तेही तरुणांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसून येते. पती-पत्नीच्या नात्यामध्ये वादविवाद, भांडणं वाढली आहेत. छोट्या छोट्या कुरबुरी मोठ्या भांडणांपर्यंत जाऊन पती-पत्नींमधील नातं पणाला लागताना दिसत आहे. याच संदर्भात काऊन्सेलर आणि टॅरो कार्ड रीडर जीविका शर्मा यांनी काही उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत.

एखाद्या व्यक्तीने आपलं नातं वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे?

पती-पत्नीचं जन्मोजन्मीचं नातं एक घाव दोन तुकडे असं वागून सहजासहजी तोडता येत नाही. व्यक्तिस आपलं नातं खरोखरंच वाचवायचं असेल तर त्याने एक प्रयत्न करून पाहायला हवा. त्या व्यक्तीनं आपल्यातील नातं गांभीर्याने घेतलं पाहिजे.

खालील गोष्टींचं अनुकरण केल्यास नातं वाचवता येईल-

आपलेच तर्क लावण्याचा प्रयत्न करू नका. नात्यात वादविवाद, भांडण होणं अगदी सामान्य गोष्टी आहेत. कारण कोणत्याही दोन व्यक्ती एकसारख्या असत नाहीत. जिथे मतभेद आहेत तिथे कलह देखील असणार. म्हणूनच जेव्हा केव्हा तुमचे जोडीदारासोबत वाद होतील, तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदारास समजून घेण्याची संधी मिळाली आहे असे समजा. सकारात्मक बोला. परिस्थितीपासून पळून जाऊ नका, उलट आपापसात बोलून समस्येवर कायमचा तोडगा सापडेल.

आपल्या जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद झालाच तर आपल्या रागावर ताबा ठेवा. रागारागात तुम्ही कधीही जोडीदाराचं म्हणणं ऐकून घेऊ शकणार नाही आणि त्यास समजूही शकणार नाही. आणि जर तुम्ही ऐकू शकला नाहीत तर भांडणाच्या मुळ कारणापर्यंत पोहचू शकणार नाही. अशात जर दोघांना आपण का भांडत आहोत हेच माहीत नसेल तर त्यातून तोडगा कसा निघणार? तेव्हा आपापसातील भांडण जर तुम्हाला कायमचं मिटवायचं असेल तर स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवल्यानंतर साथीदारासोबत विनम्रपणे बोला. भांडण मिटवताना आपण कसं बोलतो याकडे लक्ष असू द्या. कठोरतेने आणि टोचून बोललात तर जोडीदारास आणखी राग येईल, त्यामुळे सर्व सुरळीत होता होता परिस्थिती एकदमच बिघडेल. कोणतंही भांडण मिटवण्यासाठी अंगी विनम्रता बाणली पाहिजे. यामुळे जोडीदाराचा राग शांत करण्यात मदत होईल.

आपल्या जोडीदारासोबत वाद घालत असताना बंडखोरी करू नका. याचा अर्थ असा की, जोडीदारास तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे वा त्याला त्या विषयावर बोलायचे आहे, तर त्याला शिंगे दाखवून उत्तर देऊ नका. एका आरोपाचे उत्तर दुसरा आरोप करून द्यायचे नाही. उलट जोडीदार तुम्हाला काय सांगू पाहत आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या विषयाकडे पाहिले तर, कदाचित त्यांना जे म्हणायचे आहे त्याच्या मुळाशी तुम्ही जाऊ शकाल. तसेच त्याचा मुद्दा अधिक चांगलेपणाने समजू शकाल.

एकदा त्यांचं म्हणणं तुम्हाला समजलं तर तुम्ही परिस्थितीही नीट पाहू शकाल. तुमचा जोडीदार चुकीचा असला तरीही शांतपणे एखादी गोष्ट समजता आणि समजावता येऊ शकते.

दोघांपैकी एकाने परिस्थिती नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. परिस्थिती टोकापर्यंत गेली तर त्यावर उपाय करणे अवघड होऊन बसते आणि मग बरेचदा नाते तुटते.

वेळीच सावध झाल्यास तुम्हाला नाते तुटण्यापासून वाचवण्यास मदत मिळेल. आपण बरेचदा असं काही बोलतो जे आपल्याला बोलायचे नसते, नि असं काही ठरलेलं देखील नसतं. पण ते घडतं आणि मग पश्चाताप होतो. ही सामान्य गोष्ट आहे, असं वाटलं म्हणून लाज वाटून घेण्याची गरज नाही. पण आपली चूक मान्य न करणं आणि काहीही वाईट घडलं की त्यासाठी पत्नीला जबाबदार धरणं हे चुकीचं आहे. अशी सवय नातं तोडण्यास कारण ठरते. तेव्हा असं करू नका.

वरती दिलेल्या गोष्टींवर लक्ष दिल्यास आपल्याला कळतं की, आपण भांडणं नियंत्रणात आणू शकतो. यासाठी एकमेकांस मदत करु शकतो. विवाहित जोडप्यांसोबतच डेटिंग करणाऱ्या युगुलांसाठीही हे नियम लागू होतात. त्यामुळे जे नातं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, ते तुटणार नाही याची काळजी घ्या.