बायकोशी प्रतारणा करणारे बॉलिवूडचे ५ बाहेरख्याली...

बायकोशी प्रतारणा करणारे बॉलिवूडचे ५ बाहेरख्याली नवरे (5 Married Bollywood Actors Who Cheated Their Wives With Other Women, But Luckily Got A Second Chance)

बॉलिवूडमध्ये प्रेमप्रकरण आणि प्रेमभंग यांच्या बातम्या नित्य येत असतात. पण काही बॉलिवूड स्टार्सच्या बायकांनी, त्यांच्या नवऱ्याने भानगडी केल्या तरी त्यांची कास सोडली नाही. आपला संसार उद्ध्वस्त होऊ दिला नाही. आता ही जोडपी भलेही सुखाचा संसार करत आहेत. पण या ५ बाहेरख्याली नवऱ्यांनी घरवालीशी प्रतारणा कशी केली होती, ते पाहूया.

अक्षयकुमार
अक्षयकुमारची प्रेमप्रकरणे त्याच्या इतकीच प्रसिद्ध आहेत. बॉलिवूडच्या बऱ्याच हिरॉईन्सशी त्याने प्रेमकूजन केले आहे. लग्नानंतरही त्याच्या भानगडी चालूच होत्या. कारण त्याचं मन प्रियंका चोप्रावर बसलं. दोघांनी बरेच चित्रपट एकत्र केले. मात्र त्याची बायको ट्‌विंकल खन्नाच्या कानी हे प्रकरण गेलं, तेव्हा तिनं आवाज उठवला. प्रियंका बरोबर यापुढे काम करायचं नाही, हे तिनं अक्षयला बजावलं. तेऱ्हा कुठे अक्षय प्रियंकापासून दूर झाला. पण बायकोच्या रागापायी अक्षयने आपली प्रेमप्रकरणे थांबवली. अन्‌ संसारी गृहस्थ झाला. आता अक्षय आणि ट्‌विंकल हे आदर्श जोडपं समजलं जातं.

शाहरूख खान
लग्न झालं तरी शाहरूख बहकला होता. तो देखील प्रियंका चोप्राशी जवळीक साधून होता. ही भानगड त्याची बायको गौरी खानच्या कानावर गेली, तेव्हा तिने राग व्यक्त करून शाहरुखला ताळ्यावर आणले. त्यानंतर शाहरुखने प्रियंकाशी दुरावा निर्माण केला नि आपल्या संसारात पूर्णपणे लक्ष घातले. आता शाहरुख-गौरी आपल्या संसारात रममाण झाले आहेत.

गोविंदा
गोविंदा आणि राणी मुखर्जी यांची सिनेमात छान जोडी जमली होती. असं म्हणतात की, ही जोडी पडद्याबाहेर देखील चांगलीच जमली होती. दोघांमध्ये मैत्रीच्या पुढे नातं जमलं होतं. हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत, अशाही चर्चा झडल्या होत्या. हे कळल्यानंतर गोविंदाची बायको सुनिता हिने त्याच्यावर रोष दाखवला, पण त्याची साथ सोडली नाही. तिचं उदार मन पाहून गोविंदाने सुनिताची माफी मागितली, अन्‌ तिनंही त्याला स्वीकारलं. आता हे दोघे आपल्या संसारात खुश आहेत.

अमिताभ बच्चन
कोणे एके काळी महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं प्रेमप्रकरण भयंकर चर्चेत होतं. इतकी वर्षं झाली, तरी त्या गोष्टींबाबत लोक चवीने बोलतात. अजूनही त्यांच्याबद्दल तर्क लढविले जातात. यात गंमत अशी आहे की, अमिताभने आपले हे प्रेमप्रकरण कधीच उघड केले नाही; पण रेखाने खुलेआम कबूल केले. अमिताभची ही भानगड जया बच्चनपर्यंत पोहचली, तेव्हा तिचा संताप अनावर झाला. अन्‌ ‘राम बलराम’ चित्रपटाचे शूटिंग चालू असताना जया तिथे पोहचली. अन्‌ तिने रेखाच्या मुस्काटात ठेऊन दिली. जयाच्या या उद्रेकानंतर मात्र अमिताभ रेखापासून दूर झाला. अशा रितीने जयाने आपला संसार वाचवला.

शत्रुघ्न सिन्हा
शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉयची प्रेमकहाणी जगजाहीर आहे. लग्नाच्या आधीपासून शत्रुघ्न, रीनाशी संबंध ठेवून होता. पण त्याने लग्न पूनमशी केले. लग्नानंतरही शत्रुघ्नच्या रीना रॉयशी गाठीभेटी चालूच होत्या. अन्‌ त्याची बायको पूनम हिला ही भानगड माहीत होती. तिच्या मनाचा मोठेपणा होता की, हे जाणून देखील तिने शत्रुघ्नचा हात सोडला नाही. मात्र एक वेळ अशी आली की, शत्रुघ्नने रीनाशी संबंध तोडले व पूनमबरोबर संसारात रममाण झाला.