अपचन झाल्यास, करा हे घरगुती उपचार (5 Home Ayurv...

अपचन झाल्यास, करा हे घरगुती उपचार (5 Home Ayurvedic Remedies For Indigestion)

ॲसिडिटी, बद्धकोष्ठ, अतिसार, उल्टी, पोटदुखी इत्यादी कारणांमुळे अपचनाची समस्या उद्‌भवते. ही समस्या दूर करण्यासाठी अतिशय परिणामकारक असे घरगूती उपचार आहेत, जे तुम्हाला लगेचच आराम मिळवून देतील. हे उपचार नक्की करून पाहा.
अपचनाच्या समस्येवर ५ घरगुती उपचार
1. काहीही खाल्ल्यानंतर तुमची ॲसिडिटी वाढत असेल तर पाच-सहा तुळशीची पानं किंवा बडिशेप चावून खा. असे केल्याने तुम्हाला ॲसिडिटीच्या त्रासापासून मुक्तता मिळेल.
2. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना अपचनाची समस्या सतावते. बद्धकोष्ठता असेल तर रोज अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर घालून, ते पाणी प्या. बद्धकोष्ठतेचा त्रास राहणार नाही.
3. अतिसारामुळे अपचन होत असेल तर दोन टेबलस्पून दह्यामध्ये अर्धा टीस्पून मेथीचे दाणे आणि जिरं घालून खा. दिवसातून तीन वेळा असे केल्यास अतिसारापासून आराम मिळतो आणि अन्न देखील व्यवस्थित पचतं.

  • 4. पोटदुखी, अपचन किंवा अन्नातून विषबाधा असे काही त्रास होत असतील तर १ ग्लास गरम पाण्यामध्ये चिमुटभर हिंग आणि चिमुटभर काळं मीठ घालून, ते पाणी दिवसातून दोन-तीन वेळा प्या. तुम्हाला लगेचच आराम मिळेल.
  • 5. सतत उलटी होऊन खाल्लेलं अन्न पोटात टिकत नसेल तर प्रत्येकी १-१ टीस्पून आल्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून दिवसातून २-३ वेळा प्या. असे केल्याने उलटी होणे बंद होईल.