बॅगमध्ये असायलाच हव्या अशा 5 गोष्टी ( 5 Essenti...

बॅगमध्ये असायलाच हव्या अशा 5 गोष्टी ( 5 Essentials You Must Carry In Bag)

घराबाहेर पडल्यानंतर घरी सुखरूप परत येईपर्यंतचा मधला प्रवासही सुखकर व्हावा, यासाठी आपल्या बॅगमध्ये असायलाच हव्यात अशा काही गोष्टी –


1    स्वतःचं ओळखपत्र : घरातून बाहेर पडण्यापूर्वी आधार कार्ड किंवा मान्यताप्राप्त इतर कोणतंही ओळखपत्र असल्यास जरूर बॅगेत ठेवा.

2    संकटाच्या (गरजेच्या) वेळेत उपयोगी पडतील असे संपर्क : तुमच्या घराचा, ऑफिसचा पत्ता, संपर्कासह तसेच आपल्या कुटुंबातील नातेवाइकांचे संपर्क नंबर्स असलेली डायरी अवश्य ठेवा.

3    हेल्थ केअर कार्ड : गंभीर जखम झाल्यास वा इतर आरोग्याच्या संदर्भातील अडचणी आल्यास तुमचे हेल्थ कार्ड सोबत असेल तर तुमच्या आरोग्यासंबंधीची माहिती इतरांना कळायला मदत होईल.

4    आरोग्यविषयक (मेडिकल) माहिती : तुम्हाला कोणत्या औषधांची अ‍ॅलर्जी आहे, आपत्कालीन औषधं, आजार असल्यास त्याबद्दलची माहिती देणारी काही कागदपत्रं असावीत.

5    आपत्कालीन औषधोपचार : आपल्याला एखादा आजार असल्यास त्यासंबंधीची औषधं तसेच इन्जेक्शन असल्यास ती बॅगेत ठेवावी. कधी अचानक त्यांची गरज पडेल सांगता येत नाही.