कुरळ्या केसांनी सुंदर दिसणाऱ्या बॉलिवूडच्या ५ अ...

कुरळ्या केसांनी सुंदर दिसणाऱ्या बॉलिवूडच्या ५ अभिनेत्री (5 Bollywood Actresses Who Rock Their Naturally Curly Hair)

कंगना रणौत ही जितकी बेबंद वागते, तितकीच ती गुणवान, रूपसुंदर आणि बोल्ड अभिनेत्री आहे. ती चित्रसृष्टीत आली तेव्हा तिचा सडसडीत बांधा आणि त्याचबरोबर तिच्या कुरळ्या केसांनी सगळ्यांना आकर्षित केलं होतं. गोड चेहऱ्याबरोबरच कुरळे केस हे तिच्या सौंदर्याचे मापदंड बनले. हे कुरळे केस तिला फारच शोभून दिसतात.

तुम्ही स्वतःच फरक बघा व तुलना करा…

तापसी पन्नूमध्ये अतिशय चांगले अभिनयगुण आहेत. पण तिचे कुरळे केस हेही तिचे एक बलस्थान आहे. तापसीचं नाव घेताच तिची कुरळ्या केसांची छबि डोळ्यासमोर येते. या केसांमुळे ती दिसतेही खूप सुंदर.

आपले सुहास्य आणि कुरळे केस ही जुही चावलाची ओळख आहे. लांब कुरळे केस हे तिच्या व्यक्तीमत्त्वाचा देखणा पैलू ठरतात. त्यामुळे ती दिसते खूपच सुंदर. चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारच्या केशभूषा कराव्या लागतात. पण जुहीने स्ट्रेट केसांचा लूक फारच कमी वेळा ठेवला आहे.

बिपाशा बसु आहे फारच सेक्सी. पण तिच्या कुरळ्या केसांनी ती अधिकच सेक्सी दिसते. स्ट्रेट केसांचा लूक ती चांगल्या प्रकारे कॅरी करते. पण कुरळ्या केसांनी तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

प्रीति झिंटा अतिशय खेळकर अभिनेत्री आहे. त्यातच तिचे कुरळे केस फारच शोभून दिसतात. तिचे नैसर्गिक कुरळे केस तिचा चेहरा अधिकच मोहक बनवतात. प्रीतिने देखील चित्रपटांमध्ये बरेचदा स्ट्रेट केस ट्राय केलेत. पण कुरळ्या केसांमध्ये ती अधिकच सुस्वरूप दिसते.