नयन तुझे जादुगार… सुंदर डोळे असलेल्या ५ अ...

नयन तुझे जादुगार… सुंदर डोळे असलेल्या ५ अभिनेत्री (5 Bollywood Actresses With Beautiful Eyes)

बॉलिवूडच्या ५ अभिनेत्रींचे डोळे अतिशय सुंदर आहेत. त्या डोळ्यांचे बरेच जण दिवाने आहेत. एखाद्या व्यक्तीचे डोळे बोलके आहेत, असं आपण म्हणतो. कारण त्यातून भावना कळतात. अभिनयक्षेत्रात चेहऱ्यावरील भाव महत्त्वाचे असतात. अन्‌ डोळे सुंदर असतील तर ते भाव प्रकर्षाने प्रकट होतात. सुंदर डोळे अन्‌ चेहऱ्यावरील हावभाव प्रभावी असले की, त्या चेहऱ्यावरून नजर हटत नाही. या ५ अभिनेत्रींबाबत असंत म्हणता येईल. कारण त्या डोळ्यांची भाषा बोलतात, तेव्हा त्यांचं सौंदर्य अधिकच खुलून येतं.

  • ऐश्वर्या राय बच्चन

विश्वसुंदरी हा मानाचा किताब मिळवून चित्रसृष्टीत आलेली ऐश्वर्या राय बच्चन रुपसुंदर आहे. तिच्या रुपाइतकेच तिचे डोळे सुंदर आहेत. ब्लू-ग्रे-ग्रीन डोळे तिच्या चेहऱ्याला चार चांद लावतात. तिच्या सौंदर्याप्रमाणेच तिच्या डोळ्यांवर फिदा होणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

  • दीपिका पादुकोण

सध्या सर्वाधिक लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे. तिच्यासारखेच तिचे डोळे अतिशय सुंदर आहेत. तिच्या अभिनयाला काळेभोर डोळे अगदी पूरक आहेत.

  • करिश्मा कपूर

नव्वदाव्या दशकातली सर्वाधिक लोकप्रिय असलेली व कपूर घराण्याची परी शोभेल अशी करिश्मा कपूर आहे. तिच्या निळ्या डोळ्यांनी तिचे रूप अधिकच खुलून दिसते. तिच्या निळ्या डोळ्यांइतकीच ती निरागस दिसते.

  • करीना कपूर

बोल्ड आणि बिनधास्त असलेली करीना कपूर प्रेक्षकांची आवडती आहे. तिचे मिश्कील डोळे इतके बोलतात, की त्यांचा विसर पडत नाही.

  • बिपाशा बसु

बोल्ड ॲन्ड ब्युटीफूल अशी बिपाशा बसुची इमेज आहे. तिचे मोठे डोळे, तिची ही प्रतिमा अधिकच सुंदर बनवतात.