अभ्यासात मागे पडलेल्या या ५ अभिनेत्री अभिनयात फ...

अभ्यासात मागे पडलेल्या या ५ अभिनेत्री अभिनयात फारच पुढे गेल्या (5 Bollywood Actresses are Zero In Studies)

बॉलिवूडच्या काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या अभ्यासात मागे पडल्या. जास्त शिकल्याच नाहीत. पण अभिनयक्षेत्रात मात्र त्यांनी फारच प्रगती केली. बॉलिवूडमध्ये त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं.

कंगना रणौत

आपल्या दमदार अभिनयाने कित्येक सिनेमातील भूमिका कंगना रणौतने गाजवल्या. कमी काळात तिने मोठी प्रगती केली. पण अभ्यासातील तिचं प्रगती पुस्तक फारसं चांगलं नाही. कारण ती १२ वीच्या वर्गात नापास झाली. अन्‌ पुढे शिकलीच नाही, मॉडेलिंग करण्यासाठी दिल्लीला आली. तिथून मुंबईला पोहचली अन्‌ बॉलिवूडमध्ये प्रवेशकर्ती झाली. इथे ती आघाडीवर पोहचली. तिच्या इंग्रजी बोलण्याची अनेक लोकांनी खिल्ली उडवली आहे. पण तिचा आत्मविश्वास अजिबात डगमगलेला नाही.

आलिया भट्ट

‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण विद्यार्थीदशेत ती फार चमकली नाही. ती फक्त १२वी पास आहे. शाळेत असतानाच तिची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. अन्‌ तिला मागे वळून पाहावंच लागलं नाही. एकाहून एक चांगल्या चित्रपटातून अभिनय करून तिच्या अभिनयाचा कस लागला आहे.

कतरिना कैफ

धड हिंदी देखील कतरिनाला बोलता येत नाही, तरी तिनं हिंदी चित्रसृष्टीत मोठं स्थान मिळवलं. तिचं शैक्षणिक जीवन अज्ञात आहे. शिक्षणाच्या नावानं तिची बोंब दिसते आहे. कारण कतरिना वयाच्या १४व्या वर्षीच मॉडेलिंग जगतात आली. नंतर बॉलिवूडमध्ये दाखल झाली. अन्‌ अभिनय व सौंदर्याच्या जोरावर आज टॉपची अभिनेत्री बनली आहे.

काजोल

बॉलिवूडची खूपच गुणी अभिनेत्री असं नाव कमावलेली काजोल देवगण देखील शिक्षणाच्या बाबतीत पिछाडीस होती. ई स्कूलमधून शिक्षण घेऊन ती चित्रसृष्टीतच आली. अन्‌ बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं. काजोल आजही चित्रपटांमध्ये सक्रीय आहे आणि निवडक चित्रपट स्वीकारते.

करिश्मा कपूर

कपूर खानदानाची राजकुमारी समजली जाणारी करिश्मा कपूर नव्वदीच्या दशकात सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र अभिनयात आघाडी मारलेली करिश्मा शिक्षणाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. तिच्याकडे हायस्कूल शिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देखील नाही. लहान वयातच करिश्माने चित्रपटात कामे करायला सुरुवात केली. अन्‌ तिचे बरेच चित्रपट हिट झाले.