हेअर स्टाइल असावी तर या ५ बॉलिवूड अभिनेत्रींसार...

हेअर स्टाइल असावी तर या ५ बॉलिवूड अभिनेत्रींसारखी… (5 Bollywood Actress With Gorgeous Hair Style)

बॉलिवूडमधील अभिनेत्री चित्रपटातील व्यक्तीरेखेंप्रमाणे आपला लूक बदलत असतात. कधी या अभिनेत्रींचे कपडे फॅशन ट्रेंड बनतात. तर कधी यांच्या केशरचनांचा ट्रेंड येतो. काही अभिनेत्रींच्या केशरचना या इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत की त्या त्यांच्या नावानेच ओळखल्या जातात. तुम्ही देखील या केशरचना करून पाहू शकता.

१) प्रिटी झिंटा – चित्रपट दिल चाहता है

प्रिटी झिंटा अशी अभिनेत्री आहे, की जिणे तिच्या केसांवर अनेक प्रयोग करून पाहिले आहेत. दिल चाहता है या चित्रपटातील प्रिटी झिंटाची हेअर स्टाइल आजही दर्शकांच्या चांगलीच लक्षात आहे. ही हेअर स्टाइल कोणत्याही महिलेस काही मिनिटांत तरुण बनवू शकते, मग तरुण दिसायचं असेल तर ही हेअर स्टाइल नक्की आजमावून पाहा.

२) प्रियंका चोप्रा – चित्रपट दोस्ताना

दोस्ताना या चित्रपटामध्ये प्रियंका चोप्राचा अभिनय जितका आवडला तितकाच तिचा लूकही दर्शकांनी पसंत केला. विशेषतः प्रियंकाची हेअर स्टाइल. दोस्ताना मधील प्रियकांच्या स्टेप कट हेअर स्टाइलमुळे तिच्या चेहऱ्यावर चमक आणि आत्मविश्वास दिसत होता. ही हेअर स्टाइल आजही मॉडर्न आणि आत्मनिर्भर महिलांसाठी उत्तम चॉईस आहे

३) सायरा बानो – चित्रपट पडोसन

सायरा बानो यांची पडोसन चित्रपटातील हेयर स्टाइल लोकं अजूनही विसरले नाहीत. या चित्रपटातील सायरा बानो यांच्या फ्लिक्स हेअर स्टाइलमुळे तिच्या सौंदर्यात अजून भर पडली आहे. तुमचं कपाळ मोठं असेल तर तुम्ही देखील ही फ्लिक्स हेअर स्टाइल करुन तरुण आणि फ्रेश दिसू शकता.

४) काजोल – चित्रपट कुछ कुछ होता है

कुछ कुछ होता है या चित्रपटातील काजोलने साकारलेल्या अंजलीला कोण विसरेल? या चित्रपटातील काजोलचा उत्स्फुर्त आणि बबली लूक फारच लोकप्रिय झाला. याच चित्रपटात काजोलचे मोठे केसही दाखविले होते, परंतु दर्शकांना तिचा शॉर्ट बॉब कट अधिक आवडला. तरुणींनादेखील हा कट सुंदर दिसू शकतो, हे काजोलला पाहिल्यानंतर कळते. तुम्हाला काजोलसारखा बबली आणि खेळकर लूक हवा असेल तर हा शॉर्ट बॉब कट अवश्य करून पाहा.  

५) दीपिका पादुकोण – चित्रपट कॉकटेल

दीपिका पादुकोणची कॉकटेल चित्रपटातील हेयर स्टाइल तरुणींनी खूपच फॉलो केली. कॉकटेलमधील ब्लीच वेव्स हेयर स्टाइल दीपिकाला व्यवस्थित सूट झाली. या चित्रपटामध्ये तिच्या केसांना कॅरॅमल शेडने हायलाइट केले होते, ज्यामुळे ती अतिशय सुंदर व आकर्षक दिसत होती. दीपिका पादुकोण तिच्या बहुतांशी फोटो शूटमध्ये हीच हेअर स्टाइल ठेवते. दर्शकांप्रमाणेच दीपिकालाही कॉकटेलमधली तिची हेअर स्टाइल आवडते.

दीपिका पादुकोण सारखी एलिगेंट हेअर स्टाइल करायला शिकण्यासाठी हा व्हिडिओ पाहा