‘रामलखन’ला झाली ३२ वर्षं, कलाकारांनी सादर केल्य...

‘रामलखन’ला झाली ३२ वर्षं, कलाकारांनी सादर केल्या गोड आठवणी (32 years of ‘RamLakhan’; Old Pics of the Movie Shared by Stars)

१९८९ साली सुपरहिट झालेल्या ‘रामलखन’ ह्या चित्रपटाला २७ जानेवारी रोजी ३२ वर्षे झाली. त्या काळातील या जबरदस्त चित्रपटाने यामध्ये काम केलेल्या प्रत्येक कलाकारास स्वतःची ओळख दिली. माधुरी दीक्षितसह या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक कलाकाराने चित्रपटाविषयीच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. माधुरीने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक फोटो पोस्ट केला आहे. माधुरीने फिल्म युनिटचा नवा आणि जुना फोटो करून त्यावर असं लिहिलं आहे की, “रामलखनचे ३२ वे वर्ष आणि हा चित्रपट करतानाच्या अविस्मरणीय आठवणी, मी सेलिब्रेट करत आहे.” तसेच या चित्रपटातील संपूर्ण टीमने घेतलेले परिश्रम, आनंदाने आणि प्रेमाने घालवलेले क्षण या सगळ्यासाठी माधुरीने संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

फोटोसौजन्य :इंस्टाग्राम

रामलखन चे दिग्दर्शक सुभाष घई यांनीही ट्‌वीटरवर या चित्रपटातील जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये असं लिहिलंय की २७ जानेवारी १९८९ ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज ३२ वर्षांनंतरही त्यातील संगीत आणि कलाकार यांमुळे नवीन वाटतो. मी कलाकार आणि टेक्निशंस या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो. विशेषतः अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचं…

फोटोसौजन्य :इंस्टाग्राम

‘रामलखन’ १९८९ च्या यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातील संवाद आणि गाणी सुपरहिट झाली. अनिल कपूरचे वन टु का फोर… हे गाणं आजही लोकांच्या तोंडी आहे. जॅकी श्रॉफनेही या चित्रपटातील आठवणी सांगताना, हा चित्रपट आयकॉनिक असल्याचं म्हटलं आहे. रामलखन हा माझ्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे, असंही त्याने म्हटले आहे. रामलखनमुळे माधुरी दीक्षितलाही खूप प्रसिद्धी मिळाली होती.