उन्हाळ्यात घर थंड कसे ठेवाल? (20 Summer Home De...

उन्हाळ्यात घर थंड कसे ठेवाल? (20 Summer Home Decor Ideas)

उन्हाळ्यात उष्णतेने घरात बसणे कठीण होते. ए.सी., पंखे, कुलर असे कृत्रिम पर्याय आपण वापरत असतोच. परंतु नैसर्गिकरित्या घरात थंडावा निर्माण करावयाचा असेल तर फार नाही काही प्रमाणात आपल्या घरातील सजावटीमध्ये बदल करून आपण गरमीच्या दिवसांत आपलं घर थंड ठेवू शकतो. पाहूया यासाठी काय करावे लागेल.

उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी टीप्स

  • उन्हाळ्यात फ्लोरल, स्ट्राइप्स आदी प्रिंट्स पाहायला सुखद वाटतात. तेव्हा उन्हाळ्यात घरातील पडदे, उशांचे अभ्रे, बेडशीट यांसाठी अशा स्पेशल प्रिटंच्या फॅब्रिकची निवड करा.
  • खिडकीची साइज, पडद्यांचा रंग, पोत, त्याचा पॅटर्न या गोष्टी साध्या वाटल्या तरी त्यामुळे घराच्या लूकमध्ये बदल दिसून येतो. तेव्हा घरातील खिडकीच्या सजावटीकडेही लक्ष असू द्या. खिडक्यांसाठी पडद्यांची निवड करताना ते सोफ्याशी मॅच करणारे असावेत. नाहीतर घर विसंगत दिसेल.
  •  गरमीच्या दिवसांत चटईसारख्या पडद्याचा वापरही करता येईल.
  •  उन्हाळ्यात तुम्ही तुमचं घर पिंक, लव्हेंडर, यलो, एक्वा ब्लू अशा सॉफ्ट कलरने फ्लोरल थीम घेऊन सजवा. या फ्लोरल थीममुळे तुमचे घर फ्रेश आणि नवीन दिसेल.
  • उन्हाळ्यात गृहसजावटीसाठी यलो, ऑरेंज, पीच यासारखे सिट्रर कलर परफेक्ट असतात. सिट्रस थीमचे वैशिष्ट्य असे आहे की, याचे सारे रंग एकमेकांशी मिळतेजुळते असतात. तुम्ही तुमच्या घरासाठी यातील सर्वच रंगांचा वापर करू शकता.
  • गरमीच्या दिवसात दिवाणखान्यात थंड आणि ताजेतवाने वाटावे यासाठी तेथे ताजी फुलं ठेवा. ताज्या फुलांच्या रंगांनी आणि सुगंधाने ती खोली प्रफुल्लित वाटते. घरात फुलांचा मंद सुवास दरवळत राहण्यासाठी गुलाब, लिली, ट्यूलिप अशा फुलांचा तुम्ही वापर करू शकता.
  • उन्हाळ्यात घराला मॉडर्न लूक देण्यासाठी ग्लास, लेदर, मेटल अशा स्लीक फर्निचरचा वापर करा.
  • घरात खूप वस्तू न ठेवता, छानसं आर्ट वर्क, फॅमिली फोटोग्राफ्स, फुलं, कँडल्स इत्यादी मोजक्या वस्तूंच्या वापराने घर सजवा.
  • घरात सूर्यप्रकाश पुरेसा यावा यासाठी व्हाइट किंवा लाईट शेडचे पडदे लावा. शक्यतो घराच्या सर्व खिडक्या उघड्या ठेवा. त्यामुळे सूर्यप्रकाश आणि ताजी हवा दोन्हीही घरात येतील.

प्रॅक्टीकल टीप्स

१०) घर तेजस्वी आणि तजेलदार दिसावे यासाठी घराला पांढरा रंग देणे हा उत्तम पर्याय आहे. याचा दुसरा फायदा असाही होतो की, पांढऱ्या रंगासोबत कोणताही रंग मॅच होतो. त्यामुळे फर्निचरची निवड करताना फार विचार करावा लागत नाही. व्हाईटसोबत ऑलिव्ह ग्रीन, यलो, एक्वा ब्लू यासारखे सॉफ्ट कलरचे कॉम्बिनेशन करून पाहा. चांगलं दिसतं.

११) पेंट, फर्निचर वा इतर सजावटीच्या वस्तूंची निवड करताना त्यांचे रंग हे एकमेकांशी सुसंगत होतील याची काळजी घ्या. वेगवेगळ्या रंगाच्या वापराने घर विस्कळीत दिसतं. तेव्हा असं करू नका.

१२) बेडरूममध्ये अतिशय खाजगी क्षण घालविले जातात. तेव्हा बेडरूममधील बेड, बेडशीट, पडदे, ड्रेसिंग टेबल, वॉर्डरोब, लाइट्स, फोटो फ्रेम, वॉल डेकोर आदी शक्यतो स्वतःच्या पसंतीचं असावं. बेडरूममध्ये गडद रंगाचे, वजनदार पडदे असतील तर ते बदलून यलो, पीच, ब्लू यांसारखे सौम्य रंगाचे, फ्लोरल प्रिंट असलेले पडदे लावा, बेडशीटसाठीही सोम्य पेस्टल शेडच्या फ्लोरल प्रिंटचा वापर केला जाऊ शकतो.

१३) खोलीतील फर्निचरची जागा बदलूनही आपण घरात थंडावा आणू शकतो. खोलीत नको असलेले फर्निचर काढून टाका. यामुळे खोली मोठी दिसते आणि खोलीत थंडावाही राहतो.

१४) उन्हाळ्याच्या दिवसात बसण्यासाठी भारतीय बैठक उत्तम. यासाठी खोलीत मॅट्रेस घालून त्यावर कुशनची सजावट करा. यामुळे त्या खोलीचं रुप बदलेल आणि गारवाही वाटेल.

१५) तुम्ही दिवाणखान्यासाठी कारपेट वापरत असाल तर उन्हाळ्यात ते काढून टाका. कारण गरमीच्या दिवसात प्लेन जमिनीमुळे थंडपणा जाणवत राहतो.

१६) डायनिंग टेबल सजवण्यासाठी ऑरेंज, ऑलिव्ह ग्रीन, यलो आदी शेडस्‌चे नॅपकिन्स आणि प्लेट मॅट्‌स वापरा. याशिवाय चेक्स, फ्लोरल, फ्रुटी प्रिंट्‌सच्या नॅपकिन आणि प्लेट मॅट्‌सही वापरू शकता.

इंडोर प्लांटस्‌नी सजवा घर

१७) उन्हाळ्यात घराच्या आतील सजावटीकरता इंडोर प्लांट्‌ससारखा उत्तम पर्याय असूच शकत नाही. या इंडोर प्लांट्‌समुळे घर सुंदर आणि रंगबिरंगी तर दिसतेच शिवाय घरात सकारात्मक उर्जा येते, ज्यामुळे आपला मुडही चांगला राहतो.

१८) बेडरुममधील एका कोपऱ्यात टेबलवर पोथोस सारखे झाड लावा. हे सकारात्मक उर्जा देते. इंडोर प्लांट्‌स बहुतेक करून बेडरूममध्ये लावण्यासाठी उत्तम असतात. कारण ही झाडं हवेतील विषारी वायू नाहिसे करतात आणि वातावरण तजेलदार बनवितात.

१९) खिडकी वा किचनमधील कपाटावर तुम्ही हँगिंग प्लांट लावल्यास अतिशय आकर्षक दिसतात. हे हँगिंग प्लांट्‌स दिसायला सुंदर असतातच शिवाय घराची शोभाही वाढवितात. २०) ऑर्किडच्या फुलांचे झाड मध्यभागी असलेल्या टेबलवर सजवा, यामुळे तुमच्या दिवाणखाण्याच्या सौंर्द्यात निश्चितच भर पडेल. मनीप्लांटच्या वेलीला मातीची गरज नसते, ही वेल पाण्यातही वाढते. अशा वेली आपण काचेच्या बाटलीत ठेवून घरात वाढवू शकतो. खिडकीजवळ, साईड टेबल वा कपाटावर अशा वेली आकर्षक दिसतात.