१७ क्रिएटिव वॉल डेकोर आइडियाज (17 Best And Crea...

१७ क्रिएटिव वॉल डेकोर आइडियाज (17 Best And Creative Wall Decor Ideas)

वॉल ऑर्गनायझरने सजवा भिंती

 • भिंतीच्या सजावटीसाठी वॉल ऑर्गनायझर्स किंवा वॉल बॉक्सेसची मदत घेता येते. आता बाजारात विविध प्रकारचे ऑर्गनायझर्स उपलब्ध होतात. आपण आपल्या सोयीप्रमाणे त्यांचा वापर करू शकतो.
 • वेगवेगळ्या आकारात आणि रंगात उपलब्ध असलेले हे ऑर्गनायझर्स आपण आपल्या भिंतींच्या लांबी-रुंदींप्रमाणे निवडू शकतो.
 • ऑर्गनायझर्सच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण वेगवेगळ्या वॉल ॲक्सेसरीज ठेवू शकतो. शिवाय यात आपण फ्लॉवर वास, इंडोर प्लांट, फॅमिली फोटोज, घड्याळ इत्यादी ठेवून आपल्या भिंती मोहक बनवू शकतो.
 • आपण आपल्या कल्पनाशक्तीने यास अलग लूकही देऊ शकतो.

वॉलपेपर आणि वॉल आर्ट आइडियाज

 • विनाइल, हँड प्रिंटेड, ब्लोन विनाइल, रिलीफ, वुडचिप, लायनिंग व बॉर्डर्सवाला असे वैविध्यपूर्ण वॉलपेपर्स सध्या बाजारात पाहावयास मिळतात. शिवाय हे सर्वच एकापेक्षा एक सरस असतात की त्यातून आवडीचा पर्याय निवडायला कठीण जातं.
 • वॉलपेपर्समध्ये फक्त फ्लोरल नाही तर, अलग-अलग टेक्स्चरवाले वॉलपेपर्स देखील मिळतात. आपण त्यातून योग्य निवड करायची.
 • नवीन प्रयोग करून पाहावयाचा असल्यास घरातील एका भिंतीला फ्लोरल वॉलपेपर लावून इतर भिंतींना वॉलपेपरला सुसंगत असा रंग लावून पाहा.
 • वॉलपेपर्स लावल्यामुळे भिंतींचं सौंदर्य खुलून दिसतंच शिवाय घराला सारखा सारखा रंग लावण्याचा त्रासही वाचतो.
 • वॉल आर्ट मध्ये आपल्याला कुटुंबियांचे फोटो, मुलांची पेंटिंग्स, सुंदर कलात्मक वस्तूंचा वापर करून भिंतीची सजावट करता येते.
 • या व्यतिरिक्त वॉशेबल वॉलपेपर्स देखील मिळतात. हे वॉलपेपर्स ओल्या कापडाने पूसून साफ करता येतात.

वॉल ॲक्सेसरीजने सजवा भिंती

 • आजकाल बाजारात भिंतींच्या सजावटीसाठी छान ॲक्सेसरीज मिळतात, त्यांचा वापर करण्याचा पर्याय उत्तम आहे.
 • आपल्या आवडीचं पेंटिग वा फॅमिली फोटोला अँटिक फ्रेम बनवून ती वॉल ॲक्सेसरी म्हणून वापरता येते. किंवा मग घड्याळ लावून त्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम्सही लावता येतात. किंवा ॲब्स्ट्रॅक्ट पीसेस लावून भिंतीला कलात्मक लूक देता येतो.
 • कलरफुल पॉट्स, निसर्गचित्राचं वा पशु-पक्षांच्या आकर्षक पेंटिंग्ज, फोटो फ्रेम्स, सुंदर वॉल क्लॉक इत्यादींमुळेही भिंत आकर्षक बनवता येते.

वॉल स्टिकर्स

 • सध्या वॉल स्टिकर्सना भरपूर मागणी आहे. भिंत सजावटीचा हा अतिशय सोपा आणि बजेटमधला पर्याय आहे. यामुळे भिंतीला मात्र एक रिच लूक येतो.
 • वॉल स्टिकर्समुळे घरालाही एक आधुनिकतेचा लूक येतो.
 • या वॉल स्टिकर्समध्ये पक्षी, चिमण्या, कुटुंबियांशी संबंधित चांगले कोट्‌स, आपल्या आवडीचे कार्टून पात्र आदी आपल्या पसंतीनुसार विविधता उपलब्ध असते. यामुळे भिंतींचा चेहरामोहराच बदलून जातो.
 • दिवाणखान्यामध्ये बसण्याची जागा, खूर्ची वा सोफ्यामागे असलेल्या भिंतीवर वॉल स्टिकर्स लावून त्या खोलीचा वेगळा लूक अनुभवा.