१५ वर्षांची असताना या नटाने रेखाचे, सर्वांसमक्ष...

१५ वर्षांची असताना या नटाने रेखाचे, सर्वांसमक्ष घेतले बळजबरीने चुंबन (15 Years Old Rekha Was Forcibly Kissed By This Actor, The Actress Narrated Scarry Incident)

चित्रसृष्टीतील टॉपची अभिनेत्री रेखा हिने जवळपास ४०० चित्रपटांमधून विविधरंगी भूमिका निभावल्या आहेत. पण तिच्या जीवनात, करिअरच्या सुरुवातीलाच असा भयंकर प्रसंग ओढवला होता की, ती भयचकित झाली होती.  १९६९ साली ‘अंजाना सफर’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ही घटना घडली असल्याचे रेखाने स्वतःच सांगितले आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
चित्रसृष्टीत रुळलेल्या विश्वजीत या नटासोबत रेखा ‘अंजाना सफर’ चे शूटिंग करत होती. तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. दिग्दर्शक राजा नवाथे यांनी विश्वजीतला, रेखाच्या ओठांचे चुंबन घेण्यास सांगितले. या गोष्टीची रेखाला अजिबात कल्पना देण्यात आली नव्हती. 

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
विश्वजीतने रेखाला जवळ घेऊन अचानक तिचे ओठ चुंबायला सुरुवात केली. तो जवळपास ५ मिनिटे चुंबन घेत राहिला. रेखा फारच गोंधळून गेली होती. तिचे डोळे पाण्याने डबडबले. पण उपस्थित सर्व कामगार -तंत्रज्ञ जोरजोरात हसू लागले होते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
‘द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात रेखाने हा भयंकर प्रसंग कथन केला आहे. ‘अंजना सफर’ चे दिग्दर्शक राजा नवाथे होते . कुलदीप पाल, विश्वजीत आणि राजा यांनी रेखा विरुद्ध हा गोड कट रचला होता.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
वरील पुस्तकात याचे कथन करून पुढे लिहिलं आहे की, राजा नवाथे यांनी ऍक्शन बोलताच,विश्वजीतने रेखाला बाहुपाशात ओढले व ओठांचे चुंबन घेत सुटला. रेखा अचंबित झाली. कारण तिला अशी काहीच कल्पना नव्हती. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटले नाही. विश्वजीत चुंबन घेत राहिला अन उपस्थित मंडळी जयजयकार करू लागली. रेखाचे डोळे बंद होते. पण त्यात अश्रु दाटले होते…..

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम