पावसाळ्यात फॅशन करताना, या चूका कधीही करू नका (...

पावसाळ्यात फॅशन करताना, या चूका कधीही करू नका (13 Monsoon Fashion Mistakes To Avoid)

बरेचदा लोक चूका करतात आणि ही फॅशन आहे, असे बोलून मोकळे होतात. परंतु, पावसाच्या दिवसात फॅशन करताना या चूका कधीही करायच्या नाहीत…पाहूया या चूका कोणत्या असू शकतात.

पावसाळ्यात डेनिम आणि त्या वर्गात मोडणारे इतर फॅब्रिक मुद्दाम वापरू नका. कारण असे फॅब्रिक पावसात भिजल्यानंतर लवकर सुखत नाही. डेनिम वापरायचेच असेल तर शॉर्ट्‌स किंवा शॉर्ट स्कर्ट घालू शकता.

पावसाच्या मौसमामध्ये लेदर शूज आणि लेदरच्या कोणत्याही वस्तू वापरू नयेत, हे सर्वांना माहीत असते. तरीही, काही लोक लेदरचे ब्लेट्‌स, लेदर स्ट्रॅप वॉच, शूज आणि हँडबॅगदेखील लेदरचे वापरतात. पावसाळ्यात लेदरच्या या वस्तू खराब होतात आणि आपलीही गैरसोय होते.

काही लोकांना पेस्टल कलर्स वापरण्याची आवड असते, परंतु या मौसमात लाइट पेस्टल कलर्स वापरणे टाळा. अशा रंगाचे कपडे लवकर खराब होतात तसेच भिजल्यानंतर पारदर्शी दिसतात. तुम्ही बोल्ड वा गडद पेस्टल कलर्स वापरून पाहा.

पावसाळ्यात आपल्या सोयी व सुरक्षिततेच्या दृष्टीने घड्याळ, बॅग, मेकअप, शूज यासारख्या रोज वापरल्या जाणाऱ्या गोष्टी शक्यतो वॉटरप्रूफ वापरा.

धातूचे जड दागिने घालायचे टाळा, त्यामुळे त्वचेस रॅशेस येऊ शकतात.

याचबरोबर जड साडी वा जास्त नक्षीदार कपडे घालू नका.

लांब म्हणजे फूल पँट्‌स आणि फूल बॉटम्स न वापरता गुडघ्यापर्यंत वा थ्री फोर्थ बॉटम्स ही योग्य निवड ठरेल.

पांढऱ्या रंगाचे कपडे कितीही आवडत असले तरी पावसाळ्यात न घातलेलेच बरे.

खूप भडक मेकअप करू नका, नाहीतर भिजल्यानंतर सगळ्या मेकअपचा पिचका होऊ शकतो.

पावसाळ्यात उंच टाचांची चप्पल दगा देऊ शकते. अशी चप्पल वापरणे गैरसोयीचे असते शिवाय पडण्याचीही भिती असते.

फार गुंतागुंतीची केशरचना करू नये. जितकी शॉर्ट आणि साधी केशरचना असेल तेवढे सोयीची ठरेल.

फुल स्लीव आणि सैल सलवार घालण्याचा मोह देखील आवरता घ्या. कारण असे कपडे पावसात लवकर भिजतात आणि मग आपल्याला अस्वस्थ वाटत राहते.