१३ बेस्ट डिझाइनर ब्लाऊजने खुलवा तुमचे रूप (13 B...

१३ बेस्ट डिझाइनर ब्लाऊजने खुलवा तुमचे रूप (13 Best Designer Blouse: 13 Stunning Looks Of Ye Hai Mohabbatein Actress Divyanka Tripathi)

ये हैं मोहब्बतें मालिकेतील इशिता भल्ला म्हणजेच दिव्यांका त्रिपाठीचे पात्र जितकं लोकप्रिय झालं तितक्याच तिच्या अदांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. दिव्यांकाच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि सालसपणा यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. मालिकेतील वेशभूषा असो, काही महत्त्वाच्या कार्यक्रमाचं निमित्त असो वा लग्नसमारंभ तिच्या साड्यांप्रमाणेच तिच्या ब्लाऊजचे डिझाइन्सही विशेष असतात. दिव्यांकाने लग्न आणि इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने परिधान केलेल्या १३ उत्कृष्ट डिझाइन्सच्या ब्लाऊजचे पॅटर्न आम्ही खास तुमच्यासाठी येथे देत आहोत. सध्या लग्नाचा सिझन आहे, त्यासाठी जर तुम्ही ब्लाऊजचे पॅटर्न शोधत असाल तर तुम्हाला या डिझाइन्स नक्की उपयोगी पडतील.

स्मार्ट आयडियाज
फॅशन डिझायनर गौरांग शाह असं म्हणतात
* साडी असो वा लेहंगा, दोन्हीत खुलून दिसायचं असेल तर ब्लाऊजची साथ महत्त्वपूर्ण ठरते.
साडी साधी असली तरी ब्लाऊजच्या पॅटर्नमुळे तीही भारदस्त दिसते. आजकाल ब्रायडल वेअरमध्ये मोठ्या बॉर्डरवाले एल्बो स्लीव, फुलस्लीव ब्लाऊज पसंत केले जात आहेत. हे ब्रायडलला नवा लूक देतात.
* सध्याच्या तरुणींस लग्नसमारंभात मॉडर्न पद्धतीने साडी नेसावयास आवडते, खास त्यांच्या आवडीसाठी साडीस अनेक तऱ्हेने ड्रेपिंग करून नवीन लूक निर्माण केला जात आहे.
स्मार्ट आयडियाज

स्मार्ट आयडियाज
फॅशन डिझायनर श्रुति संचेति असं म्हणतात
* पारंपरिक साडीला ट्रेंच कोट, क्रॉप टॉप, शर्ट ब्लाऊज, कॉर्सेट, फुल स्लीव ब्लाऊज, हॉल्टर नेक ब्लाऊज आदीची जोड देऊन मॉर्डन दिसता येतं.
* साडी वेगवेगळ्या पद्धतीने नेसून तुम्ही मॉडर्न वधू दिसू शकता. जसे – लेहंगा साडी, डबल साडी, साडी विद केप, प्लाझो साडी, धोती साडी इत्यादी.

स्मार्ट आयडियाज
फॅशन डिझायनर मौशमी मित्रा म्हणतात
* कोणत्याही खाजगी समारंभासाठी बोट नेक, बॅकलेस बॅक, लोबॅक ब्लाऊज यांना जास्त पसंती मिळत आहे. ज्या महिलांना डीप नेकचं ब्लाऊज सूट होत नाही, त्या नेटने आपली मान कव्हर करतात.
* आधी शॉर्ट स्लीव्सचे ब्लाऊज वापरले जायचे, परंतु आता एल्बो स्लीव, फुल स्लीवच्या ब्लाऊजची फॅशन लोकप्रिय होत आहे. लग्नातील शालूसाठी एल्बो स्लीव आणि प्री-वेडिंग ड्रेससाठी फुल स्लीवच्या आउटफिट्‌सना अधिक पसंती दिली जात आहे.