वाचनाची आवड असलेले १२ कलाकार (12 Bollywood Acto...

वाचनाची आवड असलेले १२ कलाकार (12 Bollywood Actors Who Love To Read)

आघाडीचे बॉलिवूड कलावंत सदैव शूटिंग, डबिंग यामध्ये गर्क असतात. त्यामुळे त्यांना आपल्या आवडीची कामे करायला, छंद जोपासायला वेळ मिळत नाही. पण जेव्हा कधी वेळ मिळतो, तेव्हा ते लोक आपले छंद जोपासतात. काही संगीत ऐकण्यात वेळ रमवतात, तर काही जण व्यायामात दंग होतात. मात्र काही कलाकार असे आहेत, ज्यांना वाचनाची आवड आहे. अन्‌ वेळ मिळताच ते वाचनाचा आनंद घेतात.

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचा शहेनशहा, अमिताभ बच्चनला वाचनाचा भारी शौक आहे. पण त्याला फुरसत नसते. तरी पण तो दररोज सकाळी आपल्या पिताजींच्या पुस्तकातील किमान एक पान तरी वाचतोच. त्याला जी आवडतात, ती पुस्तके तो आवर्जून विकत घेतो आणि फुरसत मिळाली की नक्कीच वाचतो.

दीपिका पादुकोण

दीपिकाला पुस्तके वाचायला खूप आवडते. त्यामुळे फावल्या वेळात ती आपला हा छंद जरूर पुरा करते.

शाहरूख खान

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानने बऱ्याच चित्रपटात कामे केली आहेत. अन्‌ ते बऱ्यापैकी गाजले आहेत. त्यामुळे तो सदैव कामात गर्क असतो तरी पण वेळात वेळ काढून पुस्तके वाचतो.

आमीर खान

एका मुलाखतीत आमीर खान म्हणाला होता की, पुस्तकांची मला जबरदस्त आवड आहे. आत्मचरित्रपर पुस्तके त्याला विशेष करून आवडतात. त्याच्याकडे आवडत्या पुस्तकांची यादी आहे. आवडत्या लेखकांची पुस्तके त्याने विकत घेतली आहेत.

ट्विंकल खन्ना

आघाडीची अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्ना खूप यशस्वी ठरली नसली तरी ती यशस्वी लेखिका आहे. अन्‌ पुस्तके लिहिते नि स्तंभलेखन करते. तिची पुस्तके चांगलीच खपतात. इंग्रजीमध्ये लिहित असल्याने जगभर जातात. फावल्या वेळात ती खूप वाचन करते. वाचनाची ही आवड तिने आपल्या मुलांनाही लावली आहे.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माला पण पुस्तकांची खूप आवड आहे. विशेष करून काल्पनिक कथानकांची पुस्तके तिला आवडतात. आता लहान मुलीचा सांभाळ करत असताना तिला आपली आवड जोपासायला किती वेळ मिळत असेल, याची कल्पना नाही. पण पूर्वी शूटिंगमधून फुरसत मिळेल तेव्हा पुस्तके वाचणे आणि आवडत्या कुत्र्याशी खेळणे, हा तिचा मोठा विरंगुळा होता.

सोनाक्षी सिन्हा

सिनेसृष्टीत येण्यापूर्वी सोनाक्षी सिन्हा पुस्तकातील किडा होती. आता देखील शूटिंग संपवून घरी आल्यावर पुस्तकात डोके खुपसायला तिला खूप आवडते.

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूरला देखील आधीपासूनच पुस्तकांची आवड आहे. आपल्याला कंटाळा येतो. त्यावर उत्तम उपाय म्हणजे पुस्तकांचे वाचन हे तिने अनुभवले आहे.

सोनम कपूर

सोनम कपूर फॅशनची जेवढी शौकिन आहे, तेवढीच पुस्तकांची पण आहे. तिचा मित्रपरिवार तिला पुस्तकातील किडा, असेच बोलतात. रिकाम्या वेळात सोनम पुस्तके वाचते. आपण परिपूर्ण नाही आहोत, अशी शिकवण पुस्तके देतात, असं तिचं मत आहे. ती जास्त करून काल्पनिक पुस्तके वाचते.

सोहा अली खान

सोहा अली खान चांगली शिकलेली आहे. तिला पुस्तके वाचण्याची आवड आहे. आणि आपली मुलगी सोया हिला देखील तिने ही आवड लावली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं सोयाचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये ती आपल्या पुस्तकांचा संग्रह बघताना दिसली होती. सोहाने त्यावर कॅप्शन दिली होती – या आठवड्यात मागवलेली पुस्तके.

आलिया भट्ट

आजमितीला आलिया भट्ट कामात खूपच बिझी असते. पण वेळ मिळताच, ती आपली आवडती पुस्तके वाचते. आलिया देखील पुस्तकातील किडा आहे. जेव्हा ती घरी असते, तेव्हा पुस्तके हाच तिचा उत्तम विरंगुळा असतो.

सैफ अली खान

शूटिंग मधून उसंत मिळताच, सैफ अली खानला आपल्या कुटुंबामध्ये रमायला आवडते. आपला मुलगा तैमूर याच्यासह पेंटिंग आणि बागकाम करणे तो पसंत करतो. कुटुंबासह वेळ घालवल्यानंतर तो स्वतःसाठी वेळ काढतो नि त्यावेळी तो आपली आवडती पुस्तके रस घेऊन वाचतो.