नवरात्र स्पेशल : टेलिव्हिजनच्या या ११ कलावतींनी...

नवरात्र स्पेशल : टेलिव्हिजनच्या या ११ कलावतींनी साकार केल्या आहेत देवीच्या भूमिका (11 TV Actresses Who Played Goddesses Role On Screen)

नवरात्रीच्या पवित्र सणास प्रारंभ झालेला आहे. देवीची अनेक रूपे आपल्या पौराणिक कथांमध्ये आहेत. ते विषय घेऊन टेलिव्हिजन वर विविध मालिकांचे सादरीकरण झाले आहे. या पौराणिक मालिकांमध्ये देवीच्या भूमिका साकार करणाऱ्या या ११ कलावती –

 • ग्रेसी सिंह : ‘संतोषी मां सुनाये व्रत कथाएं’ या मालिकेत संतोषी मातेची भूमिका

लगान आणि मुन्नाभाई एम.बी.बी.एस. या सुपरहिट चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिका केलेली ग्रेसी सिंह छोट्या पडद्यावर आली तीच संतोषी मातेच्या भूमिकेत. २०१५ साली आलेल्या या मालिकेत ग्रेसी सिंहने केलेली ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

 • इंद्राणी हलधर : ‘मां शक्ती’ मालिकेत देवीची अनेक रूपे तिने दाखवली

निर्माते-दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनी ‘मां शक्ती’ ही पौराणिक मालिका २०१३ साली तयार केली होती. त्यामध्ये इंद्राणी हलधरने नवदुर्गेचे अनेक अवतार सादर केले. तिच्या या विविध भूमिका लोकांच्या पसंतीस पडल्या होत्या.

 • पियाली मुंशी : ‘जय जग जननी मां दुर्गा’ या मालिकेत दुर्गामातेची भूमिका

पियाली मुंशीने ‘जय जग जननी मां दुर्गा’ या मालिकेत दुर्गामातेची भूमिका केली. तेव्हा तिला मोठी प्रशंसा लाभली होती.

 • दलजीत कौर : ‘मां शक्ती’ मालिकेत दुर्गादेवीची भूमिका

दिसायला देखणी असलेली दलजीत कौर पौराणिक भूमिकेत चमकली. तिने ‘मां शक्ती’ मध्ये दुर्गादेवीची भूमिका प्रभावीपणे केली.

 • मौनी रॉय : ‘देवों के देव महादेव’ मध्ये माता सतीची भूमिका

नागिनच्या भूमिकेत मौनी रॉयला जास्त लोकप्रियता मिळाली असली तरी त्याआधी ‘देवों के देव महादेव’ मध्ये तिने माता सतीची भूमिका केली होती. आपलं रूप आणि अभिनयाचे उत्तम प्रदर्शन तिने केले होते.

 • सोनारिका भदौरिया : ‘देवों के देव महादेव’ मध्ये पार्वती मातेची भूमिका

‘देवों के देव महादेव’ ही मालिका २०११ साली प्रक्षेपित झाली होती. शंकर भगवान आणि त्यांच्या शक्तीच्या कथांचं चित्रण या मालिकेत होतं. या पौराणिक मालिकेत सोनारिका भदौरियाने पार्वती मातेची भूमिका केली होती, जी फारच गाजली.

 • पूजा बोस : दुसरी पार्वती माता

‘देवों के देव महादेव’ या मालिकेत सोनारिकाने पार्वती मातेची भूमिका सुरुवातीला केली. काही कारणास्तव तिने या मालिकेतून अंग काढून घेतलं. तेव्हा तिच्या जागी पूजा बोसला घेण्यात आलं. अशा रितीनं पूजा दुसरी पार्वती माता झाली.

 • पूजा शर्मा : ‘महाकाली अंत ही आरंभ में’ मालिकेत देवीची विभिन्न रूपे

पूजा शर्माने आपल्या अभिनव कारकीर्दीत अनेक धार्मिक मालिकांतून कामे केली. ‘महाभारत’ मालिकेत द्रौपदीची भूमिका करून ती नावारूपास आली. नंतर ‘महाकाली अंत ही आरंभ में’ या मालिकेत पूजा शर्माने सती, पार्वती आणि महाकाली अशा भूमिका केल्या.

 • प्रियंका सिंह : ‘संकट मोचन महाबली हनुमान’ मालिकेत दुर्गामातेची वेगवेगळी रूपे

मारुतीरायाची महत्ती सांगणाऱ्या या मालिकेत प्रियंका सिंहने दुर्गामातेची वेगवेगळी रूपे सादर केली.

 •  साक्षी तन्वर : ‘देवी’ मालिकेत गायत्री आणि वैष्णोदेवीच्या भूमिका

छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या साक्षी तन्वरने पौराणिक मालिकेतही आपली छाप पाडली. ‘देवी’ या मालिकेत तिने मां गायत्री आणि वैष्णोदेवी, अशा दोन भूमिका करून रसिकांची मने जिंकली.

 • गायत्री शास्त्री : ‘ओम नमः शिवाय’ मध्ये पार्वतीची भूमिका

नव्वदीच्या दशकात ‘ओम नमः शिवाय’ ही पौराणिक मालिका दूरदर्शनवर आली होती. त्यामध्ये गायत्री शास्त्रीने पार्वती देवीची भूमिका केली होती. गायत्री ही मूळची चेन्नईची आहे. तिला हिंदी बोलता येत नव्हतं. पण ही भूमिका मिळाल्यावर तिने हिंदी शिकून घेतली व यश मिळवलं.