फक्त १ चूक झाली, अन्‌ या ११ कलाकारांचं करिअर अड...

फक्त १ चूक झाली, अन्‌ या ११ कलाकारांचं करिअर अडचणीत आलं… (11 Bollywood Stars Whose Single Mistake Destroyed Their Career)

प्रत्येक माणूस जीवनात एकदा तरी चुकतोच. आणि ही एक चूक त्याला चांगलीच भोवते. बॉलिवूड स्टार्स याला अपवाद नाहीत. त्यांच्यात असे काही जण आहेत, ज्यांची फक्त १ चूक त्यांचे करिअर बरबाद करण्यास कारणीभूत ठरली.

विवेक ओबेरॉय

‘कंपनी’ या चित्रपटापासून कारकीर्द सुरू करणाऱ्या विवेक ओबेरॉयचा पुढे ‘साथिया’ हा चित्रपट हिट झाला आणि तो स्टार झाला. पण त्याने १ चूक केली, जी पुढे त्याला चांगलीच भोवली. त्यानं सलमान खानशी पंगा घेतला. या दोघांच्या जीवनातील एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्याचा सलमान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यामुळे विवेकने एक पत्रकार परिषद घेऊन सलमान खान विरोधात नको नको ते बोलला. ते अर्थात्‌च सलमानला आवडलं नाही. सलमानने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली, इतपत विवेकने त्याच्यावर दुगाण्या झाडल्या. त्याचा परिणाम असा झाला की, विवेकला चित्रपट मिळणे कठीण होऊन बसले. अन्‌ त्याचे करिअर काही वर येऊ शकले नाही.

शक्ती कपूर

चांगला खलनायक आणि उत्तम विनोदवीर म्हणून शक्ती कपूरची कारकीर्द वेगात दौडत होती. पण एक चूक करून बसला आणि तिला ब्रेक लागला. असं म्हणतात की, २००५ साली त्याच्या बाबतीत एक स्टींग ऑपरेशन करण्यात आलं. ज्यामध्ये त्याला कास्टींग काऊच बाबत दोषी ठरवण्यात आलं. या व्हिडिओमध्ये शक्ती कपूरने एका धडपडणाऱ्या तरुणीला सिनेमात काम देण्याच्या मोबदल्यात शारीरिक संबंधाची मागणी केली होती. या एका चुकीने त्याच्या करिअरला खीळ बसली.

फरदीन खान व जायेद खान

चित्रसृष्टीत फरदीन खान आला आणि त्याला चॉकलेट बॉय अशी चांगली उपाधी लाभली. ‘नो एन्ट्री’ ते ‘हे बेबी’ अशा हिट चित्रपटात त्याने कामे केली. पण कोकेन हा अंमली पदार्थ बाळगण्याच्या आरोपावरून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला अटक केली. त्यानंतर तो फिल्म इंडस्ट्रीतून जणू बादच झाला. त्याचप्रमाणे त्याचा चुलत भाऊ जायेद खान हा देखील एका चुकीमुळे इथे बाद झाला. त्याने घाईघाईत चुकीचे चित्रपट स्वीकारले, जे अजिबात चालले नाहीत. पण त्याचं करिअर थांबलं.

अभिजीत भट्टाचार्य

शाहरूख खानचा आवाज अशी ओळख, गायक अभिजीत भट्टाचार्याला मिळाली होती. त्याने शाहरूखच्या चित्रपटातील अनेक चांगली गाणी गाऊन लोकप्रियता मिळवली. पण त्याने विवादास्पद विधाने करत इकडच्या लोकांचा रोष ओढवून घेतला. तिरस्कारयुक्त विधाने आणि सर्व खान नावाच्या नायकांच्या विरोधात बकवास केली अन्‌ वादाच्या भोवऱ्यात सापडला. केलेल्या या चुकीमुळे त्याला पुढे काम मिळनासे झाले.

शायनी आहुजा

कोणाचीही ओळखपाळख नसताना शायनी आहुजाने फिल्म इंडस्ट्रीत आपलं स्थान मिळवलं होतं. पण… ते टिकलं नाही… गँगस्टर, लाइफ इन मेट्रो, भुल भुलैय्या, वेलकम बॅक आदी चित्रपटातून त्याने चांगला अभिनय करून आपला चाहता वर्ग निर्माण केला होता. पण त्याने फक्त एकच चूक केली, जिने त्याच्या जीवनात वादळ आलं… आणि सगळं करिअर संपुष्टात आलं… २००९ साली त्याच्या घरच्या कामवाली बाईने त्याच्यावर बलात्कार केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप लावला. त्यावरून त्याला ७ वर्षे सजा झाली अन्‌ त्यानंतर त्याचं करिअर जवळपास संपुष्टात आलं…

अमन वर्मा

टी. व्ही. इंडस्ट्रीचा देखणा व गुणी अभिनेता अमन वर्मावर मुली फिदा होत होत्या. पण २००५ साली एका स्टिंग ऑपरेशनने त्याचे करिअर संपुष्टात आणले. यात तो कास्टिंग काऊचमध्ये फसला.

मनीषा कोईराला

एका जमान्यात मनीषा कोईराला ही चित्रसृष्टीतील आघाडीची तारका म्हणून ओळखली जात होती. पण हे तारका पद तिला पेलवलं नाही. तिला सिगारेट आणि दारूचं असं काही व्यसन लागलं की, करिअरची तमा राहिली नाही. त्यामुळे हळूहळू ती या सृष्टीतून बाहेर टाकली गेली.

ममता कुलकर्णी

बॉलिवूडमध्ये येताच या गोड चेहऱ्याच्या अभिनेत्रीने वर्चस्व प्रस्थापित केलं. कित्येक हिट चित्रपटाची ती नायिका झाली. पण तिचं नाव गुन्हेगारी जगताशी जोडलं गेलं. अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारामध्ये ममता कुलकर्णी पकडली गेली व बरीच वर्षे दुबईच्या तुरुंगात राहिली. मुंबईचे पोलीस तिचा शोध घेत होते. कोर्टाने तिची इथली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. कित्येक वर्षांपासून ती परदेशात राहते आहे.

मंदाकिनी व मोनिका बेदी

ममता प्रमाणेच मंदाकिनी व मोनिका बेदी यांचे गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध उघडकीस आले. त्यामुळे त्यांचे फिल्मी करिअर संपले. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या सोबत मोनिकाला पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर तिला तुरुंगवास देखील घडला