१०३ वर्षांचे आजोबा करोनाला पुरून उरले; जिद्दीने...

१०३ वर्षांचे आजोबा करोनाला पुरून उरले; जिद्दीने लढून सुखरूप परतले (103 Year Old Man Beats Corona; Reached Safe At Home)

पालघर येथील १०३ वर्षांचे आजोबा करोनाशी झुंज देऊन सुखरूप घरी परतले आहेत. वयाची शंभरी पार केली तरी हिंमत न हारता करोनाशी जिद्दीने लढून हे आजोबा हॉस्पिटलातून काल घरी परतले.

पालघर शहरातील विरेन्द्र नगर विभागात राहणाऱ्या या वयोवृद्ध करोना योध्याचे नाव आहे शामराव इंगळे. वयाचं शतक पार केलेल्या या दिलेर आजोबांना कोविड – १९ चे इन्फेक्शन झाले. त्याचे निदान होताच त्यांना येथील स्थानिक हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. जबर इच्छाशक्ती आणि या महारोगाशी लढण्याची उमेद असलेल्या शामरावांनी वैद्यकीय औषधोपचारास व्यवस्थित प्रतिसाद दिला आणि सर्व सेवकांना सहकार्य दिले, असे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.

याचा परिणाम दिसून आला व शामराव आजोबा खडखडीत बरे होऊन काल घरी परतले. पालघरचे कलेक्टर डॉ. माणिक गुरसाल आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी या बऱ्या झालेल्या पेशंटला पुष्पवृष्टी करून निरोप दिला. त्याला हसतमुखाने प्रतिसाद देऊन इंगळे आजोबा घरी परतले.