मेकअप शिवायही अतिशय सुंदर दिसणाऱ्या छोट्या पडद्...

मेकअप शिवायही अतिशय सुंदर दिसणाऱ्या छोट्या पडद्यावरील या १० अभिनेत्री (10 Tv Actresses Who Look Beautiful Without Makeup)

मौनी रॉय
छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी मौनी रॉय ही टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. आपला अभिनय आणि सुंदरता यामुळे तिने आज हे यश मिळवले आहे. सोशल मिडियावर तिचे फॉलोअर्स पाहिल्यानंतर ती किती सुंदर आहे याचा आपल्याला अंदाज येतो. परंतु मौनी रॉय ही टेलिव्हिजनवर जितकी सुंदर दिसते तितकीच ती तिच्या खऱ्या आयुष्यातही सुंदर आहे

दिव्यांका त्रिपाठी
नॅचरल ब्युटी असलेल्या यादीमधील दुसरं नाव आहे दिव्यांका त्रिपाठी. अर्थात टीव्ही शो “ये है मोहब्बतें” ची बला.सुंदर और प्रतिभाशाली अभिनेत्री. दिव्यांका ऑन स्क्रीन जितकी सुंदर आहे तेवढीच ती ऑफ स्क्रीनही सुंदर आहे. तिचा चेहरा इतका गोड आहे की, सुंदर दिसण्यासाठी तिला मेकअप करण्याचीही गरज नाही. तिच्या सुंदर चेहऱ्यामध्ये अशी काही जादू आहे, तेज आहे की पाहणाऱ्याची तिच्यावरून नजर हटत नाही. पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडू शकतो. तिच्या निरागस फोटोंवरून आपल्याला याची खात्री पटेल.

जेनिफर विंगेट
सुंदर जेनिफर विंगेट ही तिच्या टेलिव्हिजनवरील मालिकांमधील व्यक्तिरेखेमुळेच ओळखली जात नसून तिची निराळीच एक ढब आहे, वेगळाच लूक तिच्याकडे आहे त्यामुळे तिच्या सौंदर्यात प्रशंसनीय अशी भर पडली आहे. तिच्या अदा ह्या बॉलिवूडमधील अभिनेत्रींनाही मागे टाकणाऱ्या आहेत. खऱ्या जीवनात मेकअप नसतानाही जेनिफर अतिशय आकर्षक, सुंदर, बोल्ड आणि मोहक दिसते.

हिना खान
स्टार प्लसवर प्रसारित होणाऱ्या “ये रिश्ताक्या कहलाता है” या मालिकेमुळे अगदी घराघरात पोहोचलेल्या अक्षरा म्हणजेच हिना खानला कोण ओळखत नाही? हिना खान अतिशय हुशार आणि खऱ्या जीवनात तितकीच सुंदरही आहे. तिची त्वचा नैसर्गिकरित्याच इतकी तेजस्वी आहे की तिला मेकअप करण्याची गरजच पडत नाही.

रश्मी देसाई
कलर टीव्हीवर प्रसारित होणारी‘उतरन’ ही मालिका आणि त्यात प्रमुख भूमिकेत असणारी रश्मी या दोहोंपैकी कोण जास्त आवडीचं झालं हे सांगणं कठिण आहे. रश्मीने या मालिकेतच नाही तर इतरही अनेक शोजमधून काम केलं आहे.तिची ग्लोइंग त्वचा ही देवाची देणगी आहे, त्यामुळे तिला मेकअपची गरजच नाही. मेकअपशिवायही रश्मी अतिशय सुंदर दिसते.

श्वेता तिवारी
‘कसौटी ज़िंदगी की’ आणि‘परवरिश’यांसारख्या अतिशय लोकप्रिय झालेल्या मालिकांमधून अभिनय करणाऱ्या श्वेता तिवारीने आपल्या चाहत्यांचं मन जिंकून घेतलेलं आहे. छोट्या पडद्यावरील उत्तम अभिनेत्रींमध्ये श्वेताचं नाव घेतलं जातं. या मालिकांमधून श्वेताने जरी एकाच प्रकारच्या भूमिका केल्या असल्या तरी ‘बिग बॉस सीजन ४’ मध्ये आल्यानंतर तिने आपलं लूक पूर्णपणे बदलून टाकलं.तिचा चेहरा अतिशय सुंदर आहे आणि रिॲलिटी शोजमध्ये सुंदर चेहरा दिसला की कॅमेरा अशा सुंदर चेहऱ्यासमोरच स्थिरावतो.

शिल्पा शिंदे
शिल्पा शिंदेने अनेक टीव्हीमालिकांमधून काम केले आहे, परंतु ‘भाबीजी घर पर हैं’या मालिकेतील यूनिक स्टाइलमुळे शिल्पा घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिचा गावरान अवतार जितका गोड वाटतो, तितकीच वेस्टर्न कपड्यांमध्येही बिना मेकअप ती अतिशय सुंदर दिसते.

देवोलीना भट्टाचार्या
टीव्ही मालिका “साथ निभाना साथिया” मधील गोपी बहू म्हणून प्रसिद्ध झालेली देवोलीना भट्टाचार्य ही छोट्या पडद्याइतकीच खऱ्या जीवनातही सुंदर आणि क्यूट आहे. तिच्या सौंदर्याने ज्यांना वेड लावले आहे असे तिचे चाहते तिला बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही अधिक महत्त्व देतात.

दृष्टि धामी
मधुबालाच्या नावानं प्रसिद्ध असलेली दृष्टिधामी तिच्या खऱ्या आयु्ष्यात अतिशय शांत आहे. ‘मधुबाला’ मालिकेमध्ये तिने जी व्यक्तिरेखा साकारली आहे, ती तिच्या खऱ्या जीवनाशी मिळतीजुळती आहे. या मालिकेमध्ये दृष्टीला आपल्या भूमिकेसाठी खूप मेकअप आणिबोजड ड्रेस घालावे लागले आहेत. परंतु खरं तर तिला सुंदर दिसण्यासाठी या कशाचीच गरज नाही आहे. मेकअपशिवाय ती अतिशय सुंदर आणि शांत दिसते

कृतिका कामरा
‘कितनी मोहब्बत है’आणि‘कुछ तो लोग कहेंगे’या मालिकांमधून लोकप्रिय झालेली कृतिका कामरा ही छोट्या पडद्यावरील सर्वांच्या परिचयाची अभिनेत्री आहे. असंही पडद्यावर तिचा मेकअप फार सौम्य असतो तरीही ती सुंदर दिसते. म्हणूनच मेकअपशिवाय राहिली तरी तिच्या सौंदर्यावर फारसा फरक पडत नाही. मेकअपशिवाय प्रत्यक्षात ती अधिक सुंदर आहे.