१० लोकप्रिय टी.व्ही. तारकांचे सिक्रेट टॅटू (10 ...

१० लोकप्रिय टी.व्ही. तारकांचे सिक्रेट टॅटू (10 Popular Television Actresses And Their Secret Tattoos)

आपल्या अंगावर सगळ्यांना दिसतील अशा जागांवर आणि कोणालाही न दिसतील, परंतु स्वतःला नि जोडीदाराला दिसतील अशा झाकलेल्या अंगावर टॅटू काढून घेण्याची फॅशन उच्चभ्रू स्त्री-पुरुषांमध्ये प्रचलित आहे. त्यामध्ये टेलिव्हिजन तारका देखील पुढेच आहेत. छोट्या पडद्यावर संस्कारी, अत्याचार पिडित सून-बहीण-वहिनी अशा भूमिका करणाऱ्या या तारका स्टाईल आणि ग्लॅमर यामध्ये बॉलिवूड तारकांपेक्षा मागे राहिलेल्या नाहीत. या तरुण तारका सोशल मीडियावर अत्यंत धीटपणे अंगप्रदर्शन करतात. त्याचप्रमाणे त्यांनी उघड्या अंगावर काढलेल्या टॅटूज्‌चे त्या सोशल मीडियावर बिनधास्त प्रदर्शन मांडतात…

रश्मि देसाई

टी.व्ही.ची ही लोकप्रिय कलाकार आपले बोल्ड फोटो व व्हिडिओज्‌ सोशल मीडियावर शेअर करून चर्चेत असते. तिनं आपल्या डाव्या पायावर कमळाच्या फुलाचा टॅटू काढला आहे.

अनिता हसनंदानी

टी.व्ही.ची नागिन, अशी प्रसिद्धी पावलेल्या अनिता हसनंदानीने गर्भारपणातील आपले फोटो व व्हिडिओज्‌ सोशल मीडियावर टाकून चर्चेत होती. तिचा नवरा आहे रोहित रेड्डी. त्याच्यावरील आपलं प्रेम प्रदर्शित करण्यासाठी तिनं मनगटावर आर हे इंग्रजी अक्षर गोंदवलं आहे. त्यासोबत छोटंसं हृदयदेखील आहे.

कविता कौशिक

चंद्रमुखी चौटाला अशी ख्याती पावलेली कविता कौशिक टॅटूची चांगलीच शौकीन आहे. तिनं आपल्या पाठीवर शंकराचा टॅटू काढून घेतला आहे, तर कंबरेवर श्रीकृष्णाचा टॅटू काढून घेतला आहे. या देवाधिकांच्या टॅटूज्‌चे प्रदर्शन ती सोशल मीडियावर करत असते.

जेनिफर विंगेट

‘बेपनाह’ या टी. व्ही. शो मध्ये झोयाची भूमिका करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट टॅटू प्रेमी आहे. तिनं आपल्या पाठीवर हकुनामा टाटा असं लिहून घेतलं आहे. त्याचा अर्थ होतो, बेफिकीर… बिनधास्त. ही अक्षरे जेनिफरच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतात. कारण ती प्रत्यक्षात आहेच बेफिकीर आणि बिनधास्त.

पवित्रा पूनिया

‘बिग बॉस १४’ मधून पवित्रा पूनियाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिनं आपल्या पाठीच्या कण्यावर सात चक्र असलेला टॅटू बनवला आहे. याचं प्रदर्शन ती सोशल मीडियावर करत असल्याने चाहत्यांमध्ये तो आवडीचा झाला आहे.

करिश्मा तन्ना

टी.व्ही.ची ही स्टायलिश आणि हॉट कलाकार सोशल मीडियावर बऱ्यापैकी दिसत असते. तिनं आपल्या डाव्या मनगटावर मां असं लिहिलेला टॅटू बनवला आहे. शिवाय कमरेवर एक मोठा टॅटू बनवला आहे. कैक वेळा बिकिनी घालून करिश्मानं हा टॅटू लोकांना दाखवला आहे.

अविका गौर

‘बालिका वधू’ मालिकेतून नावारूपास आलेली अविका गौरने बिकिनी घालून आपले हॉट फोटो प्रदर्शित केले होते. तिची ही हॉट अदा चाहत्यांना आवडली होती. तिनं आपला खांदा, मानेच्या मागे, मनगटावर आणि पायावर टॅटू काढून घेतले आहेत.

देवोलिना भट्टाचार्जी

‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून प्रसिद्धी पावलेली देवोलिना भट्टाचार्य सोशल मीडियावर देखील लोकप्रिय आहे. तिनं आपली कंबर, मान आणि हातावर टॅटू बनवले आहेत. तिनं या टॅटूंचं अनेकवार प्रदर्शन केलेलं आहे.

आशका गोराडिया

टी.व्ही. कलाकार आशका गोराडियानेही आपल्या डाव्या हातावर त्रिशूळाचा टॅटू काढला आहे.

अदा खान

‘नागिन’ या मालिकेतून नाव कमावलेली अदा खान तिच्या स्टाइलमुळे चर्चेत असते. ती टॅटूची शौकीन आहे. अदाने आपल्या मनगटावर मां असं नाव लिहून घेतलं आहे.