10+ कोलेस्ट्रॉल पातळी जलद कमी करण्याचा प्रभावी ...

10+ कोलेस्ट्रॉल पातळी जलद कमी करण्याचा प्रभावी आणि सोपा मार्ग (10+ Natural Ways to Lower Your Cholesterol Levels

वास्तविक कोलेस्टेरॉल हा एक शरीराला आवश्यक असा नैसर्गिक घटक आहे. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. रक्तामधील साखरेपासून बहुतांशी कोलेस्टेरॉल बनते. शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हॉर्मोन्सची निर्मिती कोलेस्टेरॉलपासून होत असल्यामुळे हा पदार्थ म्हणजे काही घातक, विषारी अथवा टाकाऊ  नाही. परंतु, कोलेस्टेरॉलचे रक्तामधील प्रमाण वाढले की आरोग्यसंबंधी समस्या सुरू होतात. हे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. म्हणजे आपण आपल्या आहारातून काय वर्ज्य केले पाहिजे ते पाहुया. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या सगळ्याची आवश्यकता आहे.

चरबी वाढविणारे दुग्धजन्य पदार्थ – आईस्क्रीम, चीज, मलईयुक्त दूध आण दही अशा सर्वच दुग्धजन्य पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते, याची बरेच जणांना माहिती नसते. तेव्हा कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवायचं असल्यास या सर्व दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहिलं पाहिजे. याऐवजी फॅट नसलेले दुग्धजन्य पदार्थ खा.

चिकन – चिकनमध्ये फॅटचं प्रमाण कमी असलं तरी ते आपण कसं बनवितो यामुळे बराच फरक पडतो. चिकनच्या एका मांसाळ लेग पीसमध्ये एक कप आईस्क्रीमपेक्षा जास्त फॅट्‌स आणि कोलेस्टेरॉल असते. त्यामुळे चिकन खाताना विचारपूर्वक आणि ठरावीक प्रमाणातच खाल्लं पाहिजे.

अंड्यातील बलक – अंड्यामधील बलक अर्थात पिवळ्या भागामध्ये सर्वाधिक म्हणजे २१० मिलीग्रॅम इतके कोलेस्टेरॉल असते. तेव्हा हाय कोलेस्टेरॉलची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी अंड्यामधील बलक खाणं पूर्णतः बंद केलं पाहिजे.

लोणी – हे देखील दुधापासूनच बनते. पराठा असो, ब्रेड असो वा अन्य पदार्थ त्यावर लोणी घालून खाल्ल्याशिवाय काहींना त्या पदार्थात मजा येत नाही. परंतु कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी ते कमी खावे. कारण १०० ग्रॅम लोण्यामध्ये २१५ मिलीग्रॅम इतके कोलेस्टेरॉल असते.

फास्ट फुड – फास्ट फू्डमुळे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलही जलद गतीने वाढते. १०० ग्रॅमचे चिप्सचं पॅकेट, चीज बिस्किट आणि केक या अतिशय आवडत्या पदार्थांमध्ये १७२ मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असते. अशा पदार्थांमधील फॅटचं प्रमाण अधिक असल्यामुळे हे पदार्थ कमी खाल्लेलेच बरे.

कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याचे घरगुती उपाय

१. एका संशोधनान्ती असं सिद्ध झालं आहे की, गुग्गुळाचा औषध म्हणून उपयोग केला तर कोलेस्टेरॉल कमी होते. हळदीमुळेही कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसरॉइड्‌स यांचं प्रमाण कमी होतं.

२. सकाळ-संध्याकाळ असे दिवसातून दोन वेळा कोरफड आणि आवळा यांच्या रसामध्ये मध घालून प्याल्यास फायदा होतो. या व्यतिरिक्त कोलेस्टेरॉल आटोक्यात ठेवायचं असल्यास मोड आलेले मूग खावेत.

३. ज्या व्यक्तींना हाय कोलेस्टेरॉलचा त्रास आहे त्यांनी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ला पाहिजे. त्यामुळे फायदा होतो.

४. कडवे, कसैले आणि तिखट खाद्यपदार्थ कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर, आणि फळांचं सेवन करा.५. दिवसभरात कमीत कमी ७ ते ८ ग्लास पाणी अवश्य प्या.

६. जेवण बनवून तयार झाल्यानंतर लगेचच गरम गरम खाण्याची सवय लावा.

७. एक कप दूध पातेल्यामध्ये ५ मिनिटं उकळवा आणि एका दुसऱ्या कपमध्ये पाणी घेऊन त्यात चिमूटभर वेलची आणि दालचिनी पूड मिसळा. दोन्ही एकत्र करून हळूहळू हे मिश्रण प्या.

८.कोणत्याही पदार्थात सहज मिसळून येणारं फायबर, जसे – ओट्‌स, जव इत्यादी आणि रवाळ धान्य यांच्या सेवनाने कोलेस्टेरॉल सहजतेने शरीराबाहेर पडतात. म्हणून जेवणात कमीत कमी २० ग्रॅम इतके फायबर जरून घ्यावे.

९. जेवण बनविताना हळद आणि कढिपत्त्याचा वापर अवश्य करा. त्यात कोलेस्टेरॉल कमी करण्याचे गुण आहेत. १०. दिवसा झोपू नका, कारण त्यामुळे चयापचयाची क्रिया मंदावते. सकाळी ६ वाजण्याच्या आत उठावे. वेळेवर जेवावे आणि रात्री सुपाच्य आणि हलका आहार घ्यावा.

११. एक ग्लास पाण्यामध्ये २ चमचे धणे घालून उकळवा. नंतर ते थंड होऊ द्या. हे  

मिश्रण दिवसातून ३ वेळा प्या. टरबुजाच्या बिया सुकवून ते परतवून घ्या आणि त्याचे बारीक चूर्ण बनवा. १ चमचा चूर्ण एक कप