बॉलिवूडच्या १० स्टायलिश मायलेकी (10 Most Stylis...

बॉलिवूडच्या १० स्टायलिश मायलेकी (10 Most Stylish Mother – Daughter Jodi Of Bollywood)

बॉलिवूडमध्ये अशा काही देखण्या अभिनेत्री आहेत, ज्या वय झालं तरी आपल्या मुलींशी स्पर्धा करत आहेत. या आहेत बॉलिवूडच्या १० स्टायलिश मायलेकींच्या जोड्या.

  • ट्वींकल खन्ना – डिंपल कापडिया

‘बॉबी’ या पहिल्याच चित्रपटापासून सुंदर दिसलेली डिंपल कापडिया अजूनही छानच दिसते. पण डिंपल जितकी सुंदर आहे, तितकीच तिची मुलगी ट्विंकल खन्ना सुंदर आणि स्टायलिश दिसते. मायलेकींची ही ग्लॅमरस जोडी लोकांना खूप आवडते.

  • सारा अली खान – अमृता सिंह

बॉलिवूडची सर्वात जास्त ग्लॅमरस आणि गुणवान जोडी सारा अली खान व अमृता सिंह या मायलेकींना म्हणता येईल. बोल्ड आणि ब्युटीफूल अमृता सिंहने ८० च्या दशकात आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. पण सैफ अली खानशी लग्न केल्यावर तिने चित्रपटातून ब्रेक घेतला. सारा आणि इब्राहिम ही दोन मुले मोठी झाल्यावर तिने काही चित्रपटात कामे केली. पण फार काळ टिकली नाही. पण तिची मुलगी सारा, आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

  • एशा – आहना आणि हेमा मालिनी

अभिनेत्री, नर्तकी, संसदेची खासदार हेमा मालिनी आजही स्वप्नसुंदरी भासते. एशा आणि आहना या दोन मुलींची आई असलेली हेमा, आपल्या दोन्ही मुलींसारखी तरुण व सुंदर दिसते. असं वाटतं की, एशा आणि आहना यांना स्टाईल, रुप आणि सौंदर्य आपल्या मम्मीकडून वारसाहक्काने मिळालं आहे.

  • सोहा अली खान – शर्मिला टागोर

बॉलिवूडची गुणी अभिनेत्री शर्मिला टागोर आजही आपलं रुप राखून आहे. पतौडी कुटुंबाची राजकुमारी, म्हणजे शर्मिला टागोरची मुलगी सोहा अली खान आपल्या आईसारखीच सुंदर दिसते. मायलेकी जेव्हा एकत्र दिसतात, तेव्हा लोकांची नजर त्यांच्यावर खिळून राहते.

  • करीना – करिश्मा – बबिता कपूर

रणधीर कपूरशी लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री म्हणून बबिताने बॉलिवूडमध्ये चांगली प्रसिद्धी मिळवली होती. लग्नानंतर तिने अभिनयक्षेत्र सोडले. नंतर करिश्मा आणि करीना या तिच्या दोन मुलींनी बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळवलं. या दोन मुली व बबिता यांची जोडी आजही खूपच स्टायलिश व सुंदर दिसते.

  • सोनाक्षी – पूनम सिन्हा

दबंग गर्ल म्हणून प्रसिद्धी पावलेली, शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षीला आपली मम्मी पूनम सिन्हाची खूप माया आहे. दोघींचे परस्परांबद्दल असलेले प्रेम सगळ्यांच्या नजरेत भरते. मायलेकींची ही जोडी जेव्हा एकत्र असते, तेव्हा खूपच सुंदर व स्टायलिश दिसते.

उर्वशी रौतेला – मीरा सिंह

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, ही आपली आई मीरा सिंह हिच्याइतकीच सुंदर आणि स्टायलिश आहे. मायलेकींची ही जोडी एकत्र दिसली की, मीरा सिंह, उर्वशीची आई आहे, यावर विश्वास बसत नाही. दोघी बहिणी वाटतात.

  • रायमा – रिया – मुनमुन सेन

सोज्वळ बंगाली सौंदर्य लाभलेली बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेनची मुलगी मुनमुन सेन, दोन मुलींची आई आहे. रायमा आणि रिमा यांनी बऱ्याच बंगाली व हिंदी चित्रपटात कामे केली आहेत. विशेष म्हणजे या मुली व त्यांची आई, या स्टाईलमध्ये वावरतात. फॅशनच्या बाबतीत मुनमुन सेन, मुलींपेक्षा अजिबात कमी नाहिये.

  • कोंकणा सेन शर्मा – अपर्णा सेन

कोंकणा सेनला सौंदर्य आणि अभिनय गुण, दिग्दर्शन क्षेत्रात नॅशनल ॲवॉर्ड मिळविलेल्या अपर्णा सेन या आईकडून जणू वंशपरंपरेने मिळाले आहेत. मायलेकींची ही जोडी म्हणजे ब्युटी वुईथ ब्रेन, असे उत्तम कॉम्बिनेशन आहे.

  • आलिया फर्निचरवाला – पूजा बेदी

थोड्याफार चित्रपटातून एक काळ गाजवलेली पूजा बेदी, आपली मुलगी आलिया फर्निचरवाला हिच्यावर खूप प्रेम करते. ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून आलियाने अलिकडेच चित्रसृष्टीत पदार्पण केले आहे. पूजा आणि आलिया यांची स्टाईल आणि ड्रेसेसची आवड कमालीची आहे.