१० इंडो-वेस्टर्न फॅशन आयडियाज्, तुमच्या स्टायलि...

१० इंडो-वेस्टर्न फॅशन आयडियाज्, तुमच्या स्टायलिश लूकसाठी… (10 Indo-Western Fashion Ideas To Look Stylish)

सगळ्यांपेक्षा वेगळं आणि स्टायलिश दिसायचं असेल तर आताच्या मॉडर्न स्त्रीस इंडो-वेस्टर्न आउटफिट हा अतिशय उत्तम पर्याय आहे. या १० इंडो-वेस्टर्न फॅशन आयडियाज वापरून पाहा नि स्टायलिश दिसा.

असे वापरा पारंपरिक पार्टी वेअर
१. पारंपरिक शॉर्ट ड्रेस, लॉन्ग इव्हिनिंग ड्रेस, शॉर्ट कुर्ती, रॉ सिल्क साडी यापैकी तुमच्या आवडीप्रमाणे जे तुम्ही पार्टीसाठी घालून जाल, त्यात तुम्ही अतिशय सुंदर दिसाल.
२. सण-उत्सवाचा मूड असेल तर त्यासाठी तुम्ही रॉ सिल्क, गोल्ड वर्कवाली कोटा साडी नेसून जाऊ शकता.

३. पारंपरिक कापड आणि आधुनिक एम्ब्रॉयडरी यांच्या संयोगाने तुम्ही अतिशय आकर्षक असे पार्टी वेअर्स तयार करू शकता.
४. पारंपरिक साडीसोबत आधुनिक डिझाइनचं ब्लाऊज घाला आणि कार्यक्रमात सगळ्यांमध्ये उठून दिसा.

टीनएजर्ससाठी फॅशन आयडियाज्‌
५. मॉडर्न कट्‌स, छान फॉल आणि आकर्षक एम्ब्रॉयडरीचे पारंपरिक पोशाख तरुण पिढीमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहेत.
६. पारंपरिक पोशाखांवर भौमितीक प्रिंट्‌स, स्ट्राइप्स, कैरी प्रिंट्‌स तसेच गणेश, शंकर, कृष्ण इत्यादी देवतांच्या प्रतिमा किंवा श्लोक असलेले टीनएजर्सना अतिशय आवडतात.

७. भडक रंगाच्या ट्रेंडी पारंपरिक पोशाखांना सध्या अधिक पसंती मिळत आहे.
८. कांथा, इकत, आरी, मिरर, एप्लीक इत्यादी वर्कमुळे पारंपरिक पोशाखांना नवीन स्वरुप मिळालं आहे.
९. आजच्या तरुणाईला पारंपरिक शॉर्ट ड्रेस, शॉर्ट कुर्ती, टी-शर्ट, स्कर्ट इत्यादी अधिक पसंत आहेत.

पारंपरिक पोशाखासोबत दागिने कसे घालाल?
१०. पारंपरिक पोशाखासोबत सोनं, चांदी, ज्यूट, टेराकोटा इत्यादी दागिने सुंदर दिसतात. सध्या जड दागिने घालण्यास लोकांना आवडतात. तेव्हा एखादा स्ट्रांग एलिमेंट ठरवून दागिन्यांस पारंपरिक स्वरुप देता येईल.