लिंबू पाणी पिण्याचे हे १० फ...

लिंबू पाणी पिण्याचे हे १० फायदे (10 Health Benefits Of Lemon Juice)

कायम आपल्या किचनमध्ये असणारं लिंबू आरोग्यासाठी किती हितकारक आहे हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल. सौंदर्य आणि आरोग्य अशा दोहोंसाठी लिंबू पाणी अतिशय उपयुक्त आहे. सध्याच्या करोनाच्या भयावह संसर्गापासून बचावासाठीही लिंबू पाणी पिणे परिणामकारक ठरत आहे. लिंबू पाण्याचे हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही दररोज लिंबू पाणी पिण्यास सुरुवात कराच.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर आहे त्यांनी रोज लिंबू पाणी प्यायलं पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. करोनाच्या विषाणूंपासून संरक्षण म्हणूनही लिंबू पाणी पिणे फायद्याचे आहे.

वजन कमी करण्यास मदत करते

स्थूलपणा कमी करायचा आहे, तर रोज सकाळी लिंबू पाणी प्या. वजन कमी करण्याबरोबरच लिंबू पाणी प्याल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात आणि शरीराचे डिटॉक्सिफिकेशन देखील होते.

चेहऱ्यावर तारुण्यपिटीका येत नाहीत

ज्यांना तारुण्यपिटीकांचा त्रास होतो, त्यांनी रोज लिंबू पाणी प्यायलं पाहिजे. यामुळे त्यांच्या शरीरातील तारुण्यपिटीका निर्माण करणारे जिवाणू मरतील आणि त्यांची त्वचा तजेलदार बनेल. लिंबाच्या पाण्याचा आपण फेसवॉशप्रमाणेही वापर करू शकतो. त्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा आणि अतिरिक्त तेल निघून जातं.

भूक वाढते

जर तुम्हाला भूक लागत नसेल तर लिंबू पाणी प्या. यामुळे सपाटून भूक लागते.

मुतखड्याचा त्रास कमी होतो

मुतखड्याची जर सुरुवात असेल, तर लिंबू पाणी पिणे अतिशय फायद्याचे आहे. लिंबामध्ये नैसर्गिक सायट्रेट असते, ज्यामुळे खडा विरघळतो तसेच खडा होण्यापासून रोखता येतं.

सर्दी – ताप होण्यापासून वाचवते

Lemon

ज्यांना वरचेवर सर्दी ताप यांसारखे आजार होत असतात. त्यांनी लिंबाचं पाणी प्यायलं पाहिजे. यामुळे अंग जडावल्यासारखं होत नाही आणि शरीरातील पाण्याचे प्रमाणही संतुलित राहते. लिंबू पाण्यामध्ये एक चमचा मध घालून प्याल्यास अधिक चांगला परिणाम मिळतो.

सूज तसेच श्वसनासंबंधीच्या समस्या दूर करते

शरीरावर कोठेही सूज आली असल्यास लिंबू पाणी पिण्यास द्यावे. तसेच अस्थमाच्या रुग्णांसाठीही लिंबू पाणी फायदेशीर आहे. याच्या सेवनाने सांधेदुखी, सूज अशा समस्या दूर होतात.

हँगओव्हर दूर करते

मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर चालण्यासही झेपत नाही. त्यांनी लिंबू पाणी घ्यावे. अर्धा ग्लास लिंबू पाणी प्यायल्याबरोबर डोळे उघडतात आणि डोकं गरगरायचं थांबतं.

अन्नातून विषबाधा झाल्यास लिंबू पाणी प्यावे

एखाद्या व्यक्तीस अन्नातून विषबाधा झाली असेल तर लिंबू पाणी प्यावे. कारण लिंबामध्ये असलेल्या ॲसिडमुळे शरीराला फायदा होतो आणि रुग्ण लवकर बरा होतो.

पोटासंबंधीच्या समस्या दूर करते गॅस, बद्धकोष्ठ, अपचन यांसारख्या पोटाच्या समस्यांमुळे आपण त्रासतो. या सगळ्या समस्यांसाठी एकमेव उपाय आहे लिंबू पाण्याचं सेवन करा