शिका साडी नेसण्याच्या १० नवीन पद्धती (10 Easy A...

शिका साडी नेसण्याच्या १० नवीन पद्धती (10 Easy And Innovative Saree Draping Styles)

रोज एकाच पद्धतीने साडी नेसल्यानंतर आपला साडीतला लूक कायम होऊन जातो. पण आपल्याला प्रत्येक वेळी साडी नेसल्यानंतर वेगळा लूक हवा असेल तर साडी नेसण्याची पद्धत बदलली पाहिजे. पार्टी, समारंभासाठी नुसतीच साडी नेसून जाणंच पुरेसं नाही. एखाद्या कार्यक्रमाला साजेशी साडी नेसून गेलात तर तुम्ही सगळ्यांमध्ये आकर्षक दिसाल. चला तर मग आम्ही तुम्हाला साडी नेसण्याच्या १० वेगवेगळ्या पद्धती सांगतो, ज्यामुळे तुम्हाला १० नवीन लूक्स मिळतील.

कॉकटेल पार्टीसाठी गाऊन साडी

तुम्ही कॉकटेल पार्टीसाठी जात असलात तर साडी गाऊन परिधान करा. या वेशभूषेमुळे पार्टीमध्ये तुम्ही ग्लॅमरस दिसाल आणि या साडीमुळे तुम्हाला पारंपरिक लूक देखील मिळेल.

संगीताच्या कार्यक्रमासाठी नेसा सेक्सी साडी

जर तुम्ही मित्र/मैत्रिणीच्या लग्नाच्या संगीताच्या कार्यक्रमासाठी जात आहात तर सेक्सी लूकसाठी ट्रेंडी शिफॉन साडीसोबत बूस्टियर घाला. बघा या लूकमध्ये तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळ्या आणि हॉट दिसाल.

लग्नसमारंभासाठी नेसा डिझायनर साडी

लग्नसमारंभामध्ये पारंपरिक साडीसोबत ट्रेंच कोट, क्रॉप टॉप, शर्ट ब्लाउज, कोर्सेट, फुल स्लीव ब्लाऊज, हॉल्टर नेक ब्लाऊज अशा वेशभूषेमध्ये अतिशय स्टायलिश दिसाल.

फॉर्मल किंवा कॉर्पोरेट मिटिंगसाठी स्टायलिश साडी

फॉर्मल किंवा कॉर्पोरेट मिटिंगसाठी जात असाल तर साडीसोबतच बेल्ट किंवा जॅकेट घाला. साडी सोबत बेल्ट वा ब्लेजर घातलं तर तुम्हाला कॉर्पोरेट लूक मिळेल आणि तुमच्यात एक आत्मविश्वास दिसून येईल.

गॉर्जियस साडी ऑफिससाठी

ऑफिसला जाताना तुम्ही कॉटन, जॉर्जेट, शिफॉन, सिल्कची प्लेन वा प्रिंटेड साडी नेसू शकता. अशा साडीसोबत मोती किंवा हिऱ्याची ज्वेलरी घातली तरी चालेल.

किटी पार्टीसाठी हवी नाविण्यपूर्ण साडी

किटी पार्टीमध्ये वेगळं आणि स्टायलिश तसेच उठून दिसायचं तर काहीतरी नवीन प्रयोग करून पाहा. साडीचं ब्लाऊज आधुनिक डिझाइनचं घाला. हल्ली मोठ्या बॉर्डरचे एल्बो स्लीव, फुल स्लीव ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड आहे. तुम्ही देखील हा प्रकार ट्राय करू शकता. याशिवाय बोट नेक, बॅकलेस बॅक, लो बॅक ब्लाऊजही तुम्हाला ट्रेंडी लूक देईल.

न्यू लूकसाठी नेसा फ्रिल साडी

सध्या फ्रिल साडीची फॅशन आहे. कोणत्याही समारंभामध्ये खास दिसण्यासाठी तुम्ही फ्रिल साडी नेसून जाऊ शकता. फ्रिल साडी तुम्ही वेगवेगळ्या अंदाजात नेसू शकता, जसे – मुमताज स्टाईल, बेल्ट स्टाइल अशा वेगवेगळ्या पद्धतीने नेसता येते.

वरातीमध्ये नेसा रेडी टू वेअर साडी

लग्नाच्या वरातीमध्ये तुम्हाला मस्त नाचायचं असेल तर त्यासाठी टू वेअर म्हणजेच प्री- स्टिच्ड साडीचा पर्याय अगदी उत्तम आहे. टू वेअर साडी नेसायला आणि सांभाळायला दोहोंसाठी सोपी असते. त्यामुळे तुम्ही बिनधास्त नाचू शकता.

टीनएजर्ससाठी कॉन्सेप्ट साडी

टीनएजर्सना स्टायलिश कपडे घालायला आवडतात. त्यांच्यासाठी गाऊन, धोती साडी, केप साडी इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. या साड्या तरुण मुलींवर छान दिसतात आणि तुम्ही स्टायलिशही दिसता.

 सणासुदीला परिधान करा लेहंगा साडी

घरामध्ये पूजा आहे वा नवरात्रीमध्ये गरबा खेळायला जायचं आहे किंवा मित्र/मैत्रिणीच्या संगीत कार्यक्रमासाठी जायचं आहे तर साडी लेहंग्याप्रमाणे नेसा. यामुळे तुम्हाला नवीन लूक मिळेल आणि साडी सांभाळण्याचे टेन्शनही राहणार नाही.