पहिल्या चित्रपटाच्या वेळी असे दिसणारे सुपरस्टार...
पहिल्या चित्रपटाच्या वेळी असे दिसणारे सुपरस्टार्स आता किती बदलले आहेत, ते पहा (10 Ballywood Stars Now And Then Look : See Their Drastic Transformation)

काळानुसार सगळेच बदलतात. काही लोकांचे रूप इतके पालटते की, ते वेगळेच भासतात. आता आपण अशाच काही बॉलिवूड स्टार्स (Ballywood Stars) बाबत बोलतोय. ते पहिल्या चित्रपटाच्या वेळी कसे दिसत होते आणि आता कसे दिसतात, ते पहा. (Now And Then Look)
‘बाजीगर’ या चित्रपटातून शिल्पा शेटटी पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये आली. तेव्हा ती साधी दिसत होती. आता तिच्यात खूप बदल झाला आहे. शस्त्रक्रिया करून तिने आपले रूप पालटले, असे बोलले जाते.

अक्षय कुमारने ‘सौगंध’ चित्रपटापासून करिअर सुरू केले. पण आता त्याचे टफ लूक अधिक चांगले दिसत आहे.

चॉकलेट हिरो म्हणून सैफ अली खान चित्रसृष्टीत आला. आता मात्र तो खूपच टफ दिसतो आहे.

शाहरुख खानला रोमान्सचा बादशहा म्हटले जाते. ‘दिवाना’ या चित्रपटातील त्याचा भोळा चेहरा पाहून कोणालाच वाटलं नव्हतं की, तो संपूर्ण चित्रसृष्टी व्यापून टाकेल.

‘प्रेमकैदी’ चित्रपटात करिश्मा कपूर जेव्हा पहिल्यांदा आली, तेव्हा ती इतकी प्रगती करेल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तेव्हा तिची हेअर स्टाईल भुवया यांना काहीच आकार नव्हता. पण नंतर ती स्टायलिश अभिनेत्री म्हणून नावाजली.

आपल्या या बहिणीपेक्षा करीना फारच वेगळी होती. ती स्टायलिश होती खरी, पण स्थूलपणा हटवून तिने जेव्हा झिरो साईज फिगरची संकल्पना फिल्म इंडस्ट्रीला दिली, तेव्हा ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून लोकांना तिची ओळख पटली.

सावळ्या वर्णाची काजोल आज फारच हॉट दिसते. ग्लॅमर नसलेली नटी अशी सुरुवातीला तिची ओळख होती. जी समारंभांमध्ये आपले नैसर्गिक कुरळे केस विंचरून, भुवयांना आकार न देता जायची. पण काळानुसार तिचे रूप चांगलेच बदलले.

‘मैने प्यार किया’ मध्ये प्रेम हे नाव धारण करून सलमान खान रोमॅन्टिक हिरो आला होता. पण आज तो डॅशिंग सुलतान आहे, दबंग खान आहे. सलमानचा हा बदल त्याला चांगलाच खुलतो आहे.

मिस वर्ल्डचा मन पटकावून प्रियंका चोप्रा जेव्हा सिनेसृष्टीत आली, तेव्हा देसी गर्ल म्हणून प्रसिध्द झाली. खरं तर तिच्या करिअरची सुरुवात तामिळ चित्रपटाने झाली. आता तर ती बॉलिवूड मधून हॉलिवूडमध्ये पोहचली आहे.

आमीर खानचे चित्रपटात पदार्पण गोड चेहऱ्याचा रोमॅन्टिक हिरो म्हणून झाली होती. तो ‘गझनी ‘ आणि ‘सरफरोश’ मध्ये खडबडीत नायक झाला. तर ‘पीके’ आणि ‘थ्री इडियटस’ मधून विनोदवीर झाला.
