स्वयंपाकासाठी उपयुक्त १० टिप्स, ज्या प्रत्येक ग...

स्वयंपाकासाठी उपयुक्त १० टिप्स, ज्या प्रत्येक गृहिणीस माहीत हव्यात (10 Awesome Cooking Tips & tricks Every Woman Should Know)

जेवण बनविणं सोपं काम नाही. ती एक कला आहे. आणि जेवणात स्वाद आणायचा आहे तर नेहमी काही ना काही बनवत राहिलं पाहिजे. इथे आम्ही आपल्याला स्वयंपाकघरातील काही उपयुक्त टीप्स देत आहोत, ज्या गृहिणीस माहीत असायला हव्यात. या टीप्स आपलं जेवणाचं काम सोपं करतील.

  • टोमॅटोचे सूप बनविताना टोमॅटो उकळत ठेवतानाच त्यात एक हिरवी मिरची, एक लसणाची पाकळी आणि एक आल्याचा तुकडा घाला. सूप स्वादिष्ट बनेल.
  • ग्रेवीसाठी आलं-लसणाची पेस्ट बनवायची असल्यास, त्यात ६० टक्के लसूण आणि ४० टक्के आलं घ्यावं. कारण आलं चवीला जास्त स्ट्राँग असतं.
  • तुम्ही चणे, छोले वा राजमा रात्री भिजवून ठेवायला विसरलात, तर काही हरकत नाही. सकाळी गरम पाण्यामध्ये एक ते दीड तास ते भिजू द्या आणि उकळवताना त्यात २ अख्ख्या सुपाऱ्या घाला.
  • खसखस १०-१५ मिनिटं पाण्यात भिजवा आणि मग मिक्सरमध्ये वाटा. ती छान वाटली जाते.
  • भाज्या, सॅलेड इत्यादी खूप लहान आकारात कापल्यास त्यातील पौष्टिकता कमी होते.
  • लोणचे आणि भाज्या यांमध्ये घरी बनवलेली लाल मिरची घातल्यास त्यास रंग आणि चवही चांगली येते.
  • हिरव्या भाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवावे. त्यामुळे त्यातील जीवनसत्त्व वाफेसोबत उडून जाणार नाहीत.
  • डाळीत पाणी जास्त झाले म्हणून ती फेकून देऊ नका. उलट भाजी, सूप इत्यादीमध्ये त्याचा वापर करावा.
  • मसाल्यामध्ये खोबरं किसलेलं असेल तर ते जास्त वेळ हलवू नये.
  • करी संध्याकाळपर्यंत चांगली राहावयाची असल्यास त्यात अर्ध लिंबू पिळा.
Cooking Tips & tricks

टीप्स –

आंचेवरून उतरवल्यानंतरही कढई किंवा पॅन गरम असतं, त्यामुळे त्यामधील अन्न शिजत राहतं. तेव्हा जेवण विशेषतः भाताची डिश असेल तेव्हा ते जास्त शिजू नये याकरिता तो पूर्ण शिजायला काही वेळ असतानाच आंचेवरून उतरवा.

चिकन, मटण आणि मासे फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्या, तसेच त्यांना फ्रिजमध्ये ठेवताना वेगवेगळ्या पॅकेटस्‌मध्ये ठेवा.

तुम्ही मासे किंवा भाजी करण्यासाठी राईची पेस्ट बनवत असाल तर त्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी त्यात थोडी भिजवलेली खसखस, मिरची आणि मीठ घाला.

टोमॅटो सहजतेने सोलण्यासाठी तो मधून कापा आणि कापलेले भाग खालच्या बाजूच्या दिशेने ठेवत मायक्रोव्हेवमध्ये २-३ मिनिटांसाठी ठेवा.

नॉन स्टिक पॅन गरम करण्यापूर्वी त्यावर नॉन स्टिक व्हेजिटेबल कुकिंग स्प्रेने कोटींक करून घ्यायचे. तसेच त्यास ३ मिनिटांपेक्षा जास्त वेळ गरम करू नये.

पाइ बनविण्यासाठी किंवा एखादा पदार्थ मायक्रोव्हेवमध्ये गरम करायचा असेल तर त्यासाठी काचेच्या भांड्याचा वापर करा. पण केक बनविताना नॉन स्टिक आणि किंवा सिलिकॉन पॅनचा वापर करा

कोणताही पदार्थ ग्रील करण्यापूर्वी त्या ग्रीलवर नॉन स्टिक कुकिंग स्प्रे मारा. त्यामुळे कोणताही पदार्थ ग्रील करताना चिकटणार नाही.

लॉकडाऊन स्ट्रेस घालविण्याकरिता काय खाल? (Eatables to Reduce Lockdown Stress)