रोज ३० मिनिटं व्यायाम करा आणि मिळवा हे १० फायदे...

रोज ३० मिनिटं व्यायाम करा आणि मिळवा हे १० फायदे (10 Amazing Benefits Of 30 Minutes Of Daily Exercise)

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कामाच्या व्यस्ततेमुळे व्यायामासाठी वेळ काढणे शक्य होत नाही, ज्यामुळे आपले शरीर अनेक आजारांना बळी पडते. व्यायाम करण्यासाठी व्यायामशाळेतच जायला पाहिजे, हे जरूरी नाही. घरी फक्त 30 मिनिटं व्यायाम करूनही तुम्ही स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू शकता. दररोज 30 मिनिटं व्यायामाचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया-

१.कामाचा ताण आणि घरगुती जबाबदाऱ्यांमुळे तणाव येणं ही सामान्य बाब आहे. कोणत्याही लहान किंवा मोठ्या गोष्टींमुळे तणाव असू शकतो. परंतु जास्त ताण आरोग्यासाठी हानिकारक आहे. तुम्ही दररोज ३० मिनिटं व्यायाम करून पाहा, व्यायामानंतर तुम्हाला स्वतःला आराम वाटतो आणि तुमचं शरीरही ताजंतवानं राहतं.

Benefits Of 30 Minutes Of Daily Exercise

Photo Credit: Pexels.com

२. कमी झोपेमुळे आरोग्यविषयक अनेक समस्या उद्‌भवतात. जीवनशैलीतील बदलांमुळे चांगली झोप मिळणं कठीण होऊन बसलं आहे. अनेक संशोधनांनंतर असं सिद्ध झालं आहे की, दररोज व्यायाम केल्यानं झोपेची गुणवत्ता सुधारते, तसेच निद्रानाशावर नियंत्रण ठेवता येते.

Benefits Of 30 Minutes Of Daily Exercise

Photo Credit : Pexels.com

३. व्यायामाद्वारे, संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगलं होतं आणि शरीराच्या सर्व भागांना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळते.

४. स्ट्रोक आणि हृदयविकार टाळण्यासाठी, अर्धा तास व्यायाम करणे आवश्यक आहे.

५. व्यायामामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.

६. अर्धा तास व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते.

७. व्यायाम किंवा तत्सम कोणतीही शारीरिक क्रिया केल्याने मेंदूमध्ये आनंदी हार्मोन्स स्रवतात. हे हार्मोन्स आपला मूड सुधारण्यास आणि आपल्याला आनंदी ठेवण्यास मदत करतात. दररोज व्यायाम केल्याने आपले संपूर्ण आरोग्य सुधारते.

Benefits Of 30 Minutes Of Daily Exercise

Photo Credit: Pexels.com

८. दिवसभर थकवा जाणवत असेल तर रोज नियमितपणे ३० मिनिटं व्यायाम करणे आवश्यकच आहे. व्यायामामुळे ऊर्जा वाढते आणि ताजेतवाने वाटते.

९. दररोज 30 मिनिटे व्यायाम केल्याने शरीराची इतर कार्ये सुधारतात. जसे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता. एका अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की रोजच्या व्यायामामुळे स्मरणशक्ती सुधारते. व्यायामामुळे मेंदूमध्ये अशा पेशींचे उत्पादन वाढते, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढते.

१०. ३० मिनिटांच्या नियमित व्यायामाने आत्मविश्वास वाढतो, ज्यामुळे आपले व्यक्तिमत्व देखील सुधारते.