बॉडीबिल्डर मिस्टर इंडिया जगदीश लाड वर करोनाची झ...

बॉडीबिल्डर मिस्टर इंडिया जगदीश लाड वर करोनाची झडप (Tragic Death Of Young International Bodybuilder)

महाराष्ट्राचा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्याला करोनाची लागण झाली होती.

आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू अशी ख्याती असलेल्या जगदीशने मिस्टर इंडिया हा किताब मिळवला होता. तत्पूर्वी त्याने नवी मुंबई महापौर श्री, महाराष्ट्र श्री, आणि भारत श्री या प्रतिष्ठीत स्पर्धांमध्ये दोन वेळा सुवर्णपदक जिंकले होते. २०१४ साली मुंबईत झालेल्या मिस्टर वर्ल्ड या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.

सांगली जिल्ह्यातील कुंडल गावच्या जगदीशने वयाच्या १८व्या वर्षी शरीरसौष्ठवाकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि यश मिळवत राहिला. या मराठमोळ्या गड्याची देशातील १० अव्वल शरीरसौष्ठवपटूंमध्ये गणना केली जायची. मजबूत शरीरयष्टी राखलेल्या या क्रीडापटूचे दुःखद निधन झाल्याने क्रीडाक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अन्‌ करोनाचा विळखा कुणालाही पडू शकतो, याचे हे उदाहरण आहे. त्यामुळे करोनापासून बचाव करण्यासाठी मुखपट्टी, अंतरनियमन, आणि सॅनिटायजर यांचा अंगिकार करणे गरजेचे आहे.