फक्त अभिनय कौशल्यच नाही तर जान्हवी कपूरच्या अंग...

फक्त अभिनय कौशल्यच नाही तर जान्हवी कपूरच्या अंगी आहेत या देखील कला.. (Apart from Acting, Janhvi Kapoor is Also an Expert in This Work, Know About This Secret Talent of Actress)

बॉलिवूडची तरुण कलावती जान्हवी कपूर , आपली आई श्रीदेवी हिच्या पावलावर पाऊल टाकून अभिनय क्षेत्रात वाटचाल करत आहे. पण तिच्या अंगी अभिनयाशिवाय आणखी एक कला आहे. ती कळल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम

जान्हवीच्या या अज्ञात कलेचा खुलासा तिच्यासोबत ‘धडक’ मध्ये काम केलेल्या ईशान खट्टर याने केला. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, जान्हवी ही एक अतिशय चांगली अभिनेत्री आहे. अन् ती तितक्याच चांगल्या कविता रचते. ती चांगली कवी आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

जान्हवीच्या नावाबाबत देखील एक रोचक किस्सा सांगितला जातो. तो असा की, श्रीदेवीने तिचे हे नाव ‘जुदाई’ या चित्रपटानंतर ठेवलं होतं. या चित्रपटात उर्मिला मातोंडकरचे नाव जान्हवी होतं. हे नाव श्रीदेवीला खूप आवडलं होतं. सदर चित्रपटादरम्यान श्रीदेवीला दिवस गेलेल होते. नंतर तिला ही जी पहिली मुलगी झाली, तिचं नाव जान्हवी ठेवलं.

तसं पाहायला गेलं तर लोक जान्हवीची तुलना तिची दिवंगत आई श्रीदेवीशी करतात. पण जान्हवीला ते आवडत नाही. आणखी एक किस्सा असा आहे की, श्रीदेवी ही तिच्या काळात सिनेमाची सुपरस्टार असली तरी जान्हवीने डॉक्टर व्हावं अशी तिची इच्छा होती. पण जान्हवी मात्र आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत अॅक्टर झाली.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम

आईच्या निधनानंतर जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी ती कथ्थक नृत्य शिकली.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम

कामकाजात व्यस्त असली तरी जान्हवी वेळात वेळ काढून जान्हवी आपल्या आवडत्या पर्यटन स्थळी आवर्जून जाते. विरंगुळा म्हणून हिंडण्यासाठी तिच्या बऱ्याच आवडत्या जागा आहेत. पण त्यातल्या त्यात उदयपूर तिला विशेष आवडते. तिच्या संदर्भात खूप काही इंटरेस्टींग गोष्टी सांगता येतील. तिने आपल्या काही वापरण्याच्या वस्तुंना टोपण नावे दिली आहेत. जसे की, आपल्या वॉटर बॉटलला ती ‘चुस्की’ म्हणते.